IPL 2023 MI vs LSG IPL 2023 : मुंबई-लखनऊमध्ये 'करो या मरो'ची लढाई, रोहितसेना घेणार बदला?

आयपीएलच्या सोळाव्या हंगामात गुजरातचा पराभव करत चेन्नई सुपर किंग्सने दहाव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता दुसरा क्वालिफायर सामना आज खेळवला जाणार असून मुंबई आणि लखनऊ आमने सामने असणार आहेत. 

राजीव कासले | Updated: May 24, 2023, 02:45 PM IST
IPL 2023 MI vs LSG IPL 2023 : मुंबई-लखनऊमध्ये 'करो या मरो'ची लढाई, रोहितसेना घेणार बदला? title=

IPL 2023 MI vs LSG IPL 2023 : महेंद्रसिंग धोणीची (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आयपीएलच्या (IPL 2023) सोळाव्या हंगामातील पहिला फायनलिस्ट संघ ठरला आहे. आज दुसरा क्वालिफायर सामना रंगणार असून पाच वेळा चॅम्पियन ठरलेली मुंबई इंडियन्स (MumbaI Indians) आणि लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giant) आमने सामने असणार आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर संध्याकाळी साडेसात वाजता सामना खेळवला जाईल. या सामन्यातील विजेता संघ हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सशी मुकाबला करणार आहे. पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरातला (Gujrat Titans) चेन्नईकडून 15 धावांनी पराभूत व्हावं लागलं होतं. 

मुंबई सहाव्या जेतेपदापासून दोन पावल दूर
मुंबई इंडियन्सने सर्वाधिक पाच वेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे. पण गेला हंगाम मुंबई इंडियन्ससाठी अत्यंत वाईट होता. मुंबई इंडियन्सवा तळाच्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं. पण या हंगामात मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा अंतिम चार संघात झेप घेत सहाव्या जेतेपदाच्या जवळ पोहोचले आहेत. मुंबईला प्ले ऑफमध्यो पोहोचवण्यासाठी गुजरात टायटन्सचा मोठा वाटा होता. शेवटच्या लीग सामन्यात गुजरातने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पराभव करत मुंबईचं स्थान निश्चित केलं. 

लखनऊ चमत्कार घडवणार
दुसरीकडे आयपीएलचा दुसरा हंगाम खेळणारा लखनऊ सुपर जायंट्सचा संघ पहिलं जेतेपद पटकावण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. गेल्या हंगामात एलिमिनेटरमध्ये लखनऊला आरसीबीकडून पराभव पत्करावा लागला होता. पण यावेळी लखनऊ संघ सज्ज झालाय. कर्णधार केएल राहुलच्या (KL Rahul) गैरहजेरीत कृणाल पांड्याने (Krunal Pandya) दमदार नेतृत्व करुन दाखवलं आहे. 

मुंबईची फलंदाजी फॉर्मात
लखनऊसमोर सर्वात मोठं आव्हान असणार आहे ते मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीचं. मुंबईचे फलंदाज जबरदस्त फॉर्मात आहेत. लीगच्या शेवटच्या सामन्यात मुंबईच्या कॅमेरुन ग्रीनने सनरायजर्स हैदराबादविरोधात शतक ठोकलं होतं. याशिवाय सूर्यकुमार यादव (511 धावा, एक शतक, चार अर्धशतक), ईशान किशन (439 धावा), ग्रीन (381 धावा) आणि कर्णधार रोहित शर्मा (313 धावा) हे फलंदाज लयीत आहेत. 

लखनऊच्या गोलंदाजांसमोर आव्हान
मुंबईच्या फलंदाजांना रोखण्याचं प्रमुख आव्हान असणार आहे ते लेग स्पिनर रवि बिश्नोईने. 14 सामन्यात 16 विकेट घेत रवी लखनऊचा सर्वेत यशस्वी गोलंदाज आहे. याशिवाय नवीन उल हक, आवेश खान, कृणाल पांड्या आणि अनुभवी अमित मिश्रा यांच्यावरही लखनऊची मदार असणार आहे. दुसरीकडे मुंबईची गोलंदाजी मात्र फारशी आक्रमक नसल्याचा फायदा लखनऊला होऊ शकतो. 

मुंबई-लखनऊ आमने सामने
आयपीएलच्या इतिहासात मुंबई आणि लखनऊदरम्यान तीन सामने खेळवण्यात आले आहेत. तीनही सामन्यात लखनऊ विजयी झालाय. 2022 आयपीएल हंगामात मुंबई-लखनऊ पहिल्यांदा आमने सामने आले होते. या  सामन्यात केएल राहलुच्या शतकाच्या जोरावर लखनऊने मुंबईचा 18 धावांनी पराभव केला होता. दुसऱ्या सामन्यात लखनऊने मुंबईचा 36 धावांनी तर तिसऱ्या सामन्यात मुंबईचा पाच धावांनी पराभव केला होता. 

मुंबई इंडियन्स
रोहित शर्मा (कर्णधार), क्रिस जॉर्डन, सूर्यकुमार यादव, अरशद खान, जेसन बेहरेनडॉर्फ, डेवाल्ड ब्रेविस, पीयूष चावला, टिम डेविड, राघव गोयल, कॅमरन ग्रीन, ईशान किशन, डुआन जानसेन, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल , रिले मेरेडिथ, शम्स मुलानी, रमनदीप सिंह, संदीप वॉरियर, ऋतिक शौकीन, ट्रिस्टन स्टब्स, अर्जुन तेंडुलकर, तिलक वर्मा, विष्णु विनोद, नेहाल वढेरा

लखनऊ सुपर जाइंट्स
कृणाल पंड्या (कर्णधार), आयुष बडोनी, कर्ण शर्मा, मनन वोहरा, क्विंटन डिकॉक, मार्कस स्टोइनिस, कृष्णप्पा गौतम, दीपक हुड्डा, काइल मेयर्स, आवेश खान, मोहसिन खान, मार्क वुड, मयंक यादव, रवि बिश्नोई, निकोलस पूरन, यश ठाकुर, रोमारियो शेफर्ड, डेनियल सॅम्स, अमित मिश्रा, प्रेरक मांकड, स्वप्निल सिंह, नवीन उल हक, युद्धवीर सिंह चरक, करुण नायर