IPL 2023 : जगातील सर्वात मोठी असलेली क्रिकेट लीग अर्थात आयपीएल (IPL 203) आता चुरशीच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या दहा संघांच्या प्रत्येकी जवळपास 12 सामने झाले आहेत. प्रत्येक सामन्यानंतर पॉईंटटेबलमध्येही (Point Table) उलटफेर पाहिला मिळत आहे. प्ले ऑफमध्ये हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) गुजरात टायटन्सने (Gujrat Titans) जवळपास आपलं स्थान निश्चित केलं आहे. पण उरलेल्या तीन जागांसाठी जबरदस्त चुरस आहे. प्रेक्षकांची उत्सुकताही ताणली गेली आहे. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या सामन्यांना प्रेक्षकांचा जबरदस्त उत्साह पाहिला मिळतोय.
आयपीएल सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांची चढाओढ
आयपीएल सामन्यांमध्ये अनेकवेळा प्रेक्षकांची विचित्रा तऱ्हा पाहिला मिळतात. सध्या सोशल मीडियावर (Social Media) असाच एक व्हिडिओ व्हायरल होत असून युजर्स मजेदार प्रतिक्रिया देत आहेत. आयपीएलच्या सामना पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी पाहिजे ते करायला तयार असतात. आपल्या आवडत्या संघाचा सामना पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी रात्रभर तिकिट खिडकीसमोर उभं राहून तिकिट मिळवतात. काही जणं पाहिजे त्या किंमतीत ब्लॅकनेही तिकिटं विकत घेतात. एकदा का तिकिट मिळाली कि जग जिंकल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पाहिला मिळतो. स्टेडिअममध्येही त्यांचा जोश पाहण्यासारखा असतो.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. आयपीएल सामन्यादरम्यान तिकिट घेऊन प्रेक्षक स्टेडिअममध्ये सामना पाहण्यासाठी जातात. आपल्या आवडत्या खेळाडूला, आवडत्या संघाला चिअर करताना दिसतात. पण एका सामन्यादरम्यान स्टेडिअममध्ये एक मजेदार दृष्य पाहिला मिळालं. इतर प्रेक्षक स्टेडिअममधून सामना पाहत असताना एक प्रेक्षक मात्र रिकाम्या खूर्चीवर झोपून तोच सामना आपल्या मोबाईलवर (Mobile) पाहतोय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ अनेकांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर व्हायरल केला आहे. आयपीएलच्या एका सामन्यादरम्यान स्टेडिअमच्या अकदी मागच्या बाजूला काही खूर्च्या रिकाम्या असल्याचं या व्हिडिओत दिसतंय. या रिकाम्या खुर्च्यांवर एक तरुण आरामात झोपला आहे, त्याच्या हातात मोबाईल असून ज्या सामन्याचं काढून तो स्टेडिअममध्ये आला होता, तोच सामना आपल्या मोबाईलवर पाहाताना दिसतोय. लखनऊ स्टेडिअममधलं हे दृष्य असल्याचं बोललं जातंय. एका प्रेक्षकाने आपल्या मोबाईलमध्ये हा प्रकार चित्रित केला आहे.
अब इतनी दूर से नहीं दिखता है तो क्या करें pic.twitter.com/vDlvgErns7
— SANJAY TRIPATHI (@sanjayjourno) May 11, 2023
युजर्सच्या मजेदार प्रतिक्रिया
या व्हिडिओवर मजेदार प्रतिक्रिया येत आहेत. संजय त्रिपाठी नावाच्या एका युजरने म्हटलंय इतक्या लांबून सामना दिसत नसेल तर काय करणार? @JayMish12904587 या युजरने तर त्याला फॅन ऑफ द इयरच घोषित केलं आहे. एका युजरने म्हटलंय, या प्रेक्षकाचा सामना पाहण्याचा अंदाजच निराळा आहे.