IPL 2024 Final : टॉस जिंकून हैदराबादचा फलंदाजी करण्याचा निर्णय; पाहा दोन्ही संघाची Playing XI

SRH vs KKR Playing XI : आयपीएलच्या अखेरच्या सामन्यात (IPL 2024 Final) हैदराबादने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाहा दोन्ही संघात कोणते बदल झालेत?

सौरभ तळेकर | Updated: May 26, 2024, 07:17 PM IST
IPL 2024 Final : टॉस जिंकून हैदराबादचा फलंदाजी करण्याचा निर्णय; पाहा दोन्ही संघाची Playing XI title=
Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad

Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad : आयपीएल 2024 चा अंतिम सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवला जातोय. आजच्या सामन्यात यंदाचा आयपीएल विजेता संघ मिळेल. दोन ट्रॉफी जिंकणारा संघ केकेआर जिंकणार की एकदा आयपीएल ट्रॉफी उंचवणारी हैदराबाद पुन्हा चॅम्पियन होणार? याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. अशातच आता सामन्यात टॉस जिंकून सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघात कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. 

पॅट कमिन्स म्हणतो...

आम्हाला माहित आहे की आम्ही जे क्रिकेट उत्तम खेळतो ते प्रत्येक गेममध्ये काम करेलच असं नाही, परंतु जेव्हा जी युक्ती काम करेल तेव्हा ते प्रतिस्पर्ध्यांसाठी हानिकारक ठरू शकते, असं पॅट कमिन्स म्हणाला आहे.

श्रेयस अय्यर म्हणतो...

आम्ही जर टॉस जिंकलो असतो तर पहिली बॉलिंग घेतली असती. कारण आजचा सामना लाल मातीत होतोय. त्यामुळे आता प्रत्येकाने स्वत:ला दिलेलं काम केलं पाहिजे. आम्ही पुन्हा आमच्याकडे चांगली संधी आहे आणि आम्ही तसंच खेळू, असं श्रेयस अय्यर म्हणाला.

पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): रहमानउल्ला गुरबाज (WK), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (C), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

कोलकाता नाइट रायडर्स इम्पॅक्ट खेळाडू: अनुकुल रॉय, मनीष पांडे, नितीश राणा, केएस भरत, शेरफेन रदरफोर्ड.

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (WK), शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (C), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन.

सनरायझर्स हैदराबाद इम्पॅक्ट खेळाडू: उमरान मलिक, ग्लेन फिलिप्स, मयंक मार्कंडे, अब्दुल समद, वॉशिंग्टन सुंदर.