Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals: इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलच्या सतराव्या हंगामात (IPL 2024) आतापर्यंत 13 सामने खेळवले गेलेत. प्रत्येक सामन्यांनंतर पॉईंटटेबलमध्येही (IPL PointTable) मोठा उलटफेर पाहिला मिळत आहे. यादरम्यान एक मोठी बातमी समोर येतेय. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि राजस्थान रॉयल्सदरम्यानच्या (RR) सामन्यावर समस्याचं सावट पसरलं आहे. या सामन्याची तारीख आणि ठिकाण बदलण्याची शक्यता आहे.
सामन्याचं ठिकाण बदलणार?
17 एप्रिलला कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्सचा सामना होणार आहे. कोलकाताचा संघ आपल्या होम ग्राऊंडवर सामना खेळणार आहे. पण हा सामना इतर दिवशी होण्याची शक्यता आहे. सू्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआय हा सामना इतर ठिकाणी विचार करतंय. किंवा इतर दिवशी सामना खेळवला जाऊ शकतो. बीसीसीआयने दोन्ही संघाच्या फ्रँचाईजी, राज्य क्रिकेट असोसिएशन आणि प्रसारकांना याबाबतची माहिती दिली आहे.
काय होणार बदल?
वास्तविक 17 एप्रिलला राम नवमी आहे. हा सण संपूर्ण देशभराता उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरा केला जातो. यावेळी अयोध्येत राम मंदिराचीदेखील उभारणी झाली आहे. त्यामुळे देशभरातील रामभक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर कोलकाता वि. राजस्थान सामन्याला सुरक्षा पुरवता येण्याची शक्यता कमी आहे. तसंच देशात लोकसभा निवडणूक होणार आहेत. त्यामुळे सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या सर्व गोष्टींचा विचार करता हा सामना इतर दिवशी होऊ शकतो.
बीसीसीआय (BCCI) आणि क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल कोलकाता पोलिसांच्या संपर्कात आहेत. अद्याप पोलिसांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. पोलिसांनी सामन्याला सुरक्षा देण्यास असमर्थता दर्शवली तर दोन्ही संघांच्या फ्रँचाईजीना सूचना देऊन सामन्याची तारीख किंव ठिकाणी बदललं जाईल.
कोलकाता-राजस्थानची कामगिरी
आयपीएल पॉईंटटेबलमध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणारी कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानावर आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघ आतार्यंत दोन सामने खेळला असून दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. कोलकाताच्या खात्यात 4 पॉईंट जमा आहेत. कोलकाताने पहिल्या सामन्यात सनराजर्स हैदराबाद आणि दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पराभव केला. कोलकाताच्या नेट रनरेटही प्लसमध्ये आहे. तर राजस्थान रॉयल्सने आपले दोन्ही सामने जिंकले असून राजस्थान पॉईंटटेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. राजस्थानने पहिल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंटसचा तर दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला.