IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलची जगभरातील क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहात असतात. जगभरातील दिग्गज खेळाडूंचा खेळ पाहाण्याची संधी या निमित्ताने क्रिकेटप्रेमींना मिळते. यासाठी फ्रँचाईजीकडून खेळाडूंना कोट्यवधी रुपये दिले जातात. पण यावेळी ऐन स्पर्धेआधी अनेक संघांना धक्के बसले आहेत. आयपीएलमधून (IPL) अनेक खेळाडू बाहेर पडले आहेत. मोहम्मद शमी, मार्क वूड, जेसन रॉय, हॅरी ब्रूक असे स्टार खेळाडू यंदाच्या आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाहीत. आयपीएलमधून आतापर्यंत तब्बल 13 ला खेळाडू कोणत्या ना कोणत्या कारणाने बाहेर पडले आहेत.
गुजरातमधून शमी-वेड बाहेर
गुजरात संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammad Shami) पायाच्या दुखापतीमुळे आयपीएलच्या पूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे. जूनमध्ये होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपमध्येही (T20 World Cup) त्याच्या खेळण्यावर साशंकता आहे. नुकतंच शमीच्या पायावर लंडनमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. मोहम्मद शमीच्या जागी गुजरात संघात संदीप वॉरियरला संधी देण्यात आली आहे. संदीप वॉरियर भारतासाठी एक टी20 सामना खेळला आहे. शमीशिवाय ऑस्ट्रेलियाचा विकेटकिपर मॅथ्यू वेडने गुजरात संघाला धक्का दिला आहे. सुरुवातीच्या दोन सामन्यांमधून वेड बाहेर झालाय. यादरम्यान तो स्थानिक शेफील्ड शील्ड टूर्नामेंट खेळणार आहे. त्यानंतर तो भारतात येणार आहे.
लखनऊमधून मार्क वूड आऊट
केएल राहुलच्या नेतृत्वाखाली लखनऊ सुपर जायंट्समधून इंग्लंडचा स्टार वेगवना गोलंदाज मार्क वूड खेळणार नाहीए. जूनमध्ये होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपच्या तयारीसाठी मार्क वूडने आयपीएलमधून माघार घेतली आहे. मार्क वूडऐवजी लखनऊमध्ये वेस्टइंडिजचा वेगवान गोलंदाज शेमार जोसेफचा समावेश करण्यात आला आहे.
राजस्थानला 2 धक्के
संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्सला दुहेरी धक्का बसला आहे. संघाचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडलाय. गेल्या हंगामातही प्रसिद्ध कृष्णा खेळू शकला नव्हता. राजस्थानने त्याच्यावर तब्बल 10 कोटींची बोली लावत संघात घेतलं होतं. हे कमी की काय राजस्थानचा हुकमी फिरकी गोलंदाज अॅडम झम्पानेही आयपीएलमधून माघार घेतली आहे. झम्पाऐवजी राजस्थानने तनुष कोटियानला संधी दिली आहे.
कोलकातामधून इंग्लिश खेळाडू बाहेर
कोलकाता नाईट रायडर्समधून इंग्लंडचे दोन खेळाडू बाहेर झालेत. जेसन रॉय आणि गस एटकिन्सन यांनी आयपीएलमधून आपलं नाव मागे घेतलं आहे. सलामीवीर जेसन रॉय वैयक्तिक कारणाने आपीएलमध्ये खेळणार नाहीए. तर एटकिन्सनने टी20 वर्ल्ड कपच्या तयारीसाठी माघाख घेतली आहे. जेसन आणि एटकिन्सनच्या जागी फिल सॉल्ट आणि श्रीलंकेच्या दुश्मंथा चमीरा यांना संधी देण्यात आलीय.
चेन्नई संघालाही धक्का
चेन्नई सुपर किंग्सचा स्टार सलामीवीर डेवॉन कॉन्वे हाताच्या अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे संपूर्ण आयपीएलमधून आऊट झाला आहे. तब्बल 8 आठवडे तो क्रिकेटपासून दूर असणार आहे. त्याच्या जागी कोणत्या खेळाडूला संधी मिळणार हे अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही. चेन्नईच हुकमी गोलंदाज मथीशा पथिरानाही दुखापतीमुळे सुरुवातीचा सामना खेळू शकणार नाही.
दिल्ली कॅपिटल्सला कोट्यवधीचा चूना
ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्सलाही आयपीएलआधी मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा स्टार फलंदाज हॅरी ब्रूक बाहेर झालाय. दिल्ली कॅपिटल्सने 4 कोटी रुपये देऊन ब्रुकला संघात घेतलं होतं. ब्रूकने वैयक्तिक कारणाने स्पर्धेतून माघार घेतली आहे.
सूर्याने वाढवली मुंबईचं टेन्शन
टी20 स्पेशलिस्ट सूर्यकुमार यादवनेही मुंबई इंडियन्सचं टेन्शन वाढवलं आहे. शस्त्रक्रियेतून तो सावरतोय. पहिल्या फिटनेस टेस्टमध्ये सूर्या फेल झाला होता. सुरुवातीच्या काही सामन्यांना तो मुकण्याची शक्यता आहे.