Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru Match Preview : आयपीएलच्या 17 व्या हंगामातील 25 वा सामना आज (11 एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात होणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील बेंगळुरू संघाने मागील 3 सामने गमावले आहेत. त्याने आतापर्यंत 5 पैकी फक्त एकच सामना जिंकला आहे. तर दुसरीकडे हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई संघानेही 4 पैकी केवळ एकच सामना जिंकला आहे. एकंदरीत पॉईंट टेबलवरील वर्चस्व गाठण्यासाठी दोन्ही संघांसाठी आजचा सामना महत्त्वाचा असणार आहे. तर क्रिकेट प्रेंमीबद्दल बोलायचं झालं तर मॅच सुरु होण्यापूर्वीच कोणता संघ जिंकेल? हाच संघ जिंकणार...अशा अनेक चर्चा सुरु होतात. मात्र इथेतर चक्क श्वानाने सांगितले आरसीबी-मुंबईमध्ये कोणता संघ जिंकणार?
रोहित शर्माची मुंबई नेहमीच विराट कोहलीच्या टीम बेंगळुरूपेक्षा वरचढ राहिली आहे. या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 34 सामने झाले असून त्यात मुंबईने 20 जिंकले आहेत. तर बेंगळुरूने 14 मध्ये विजय मिळवला आहे. पण यंदाच्या आयपीएलमध्ये 5 सामन्यांवर नजर टाकली तर यात आरसीबीचा वरचष्मा दिसतो. आरसीबीने गेल्या 5 पैकी 4 सामने जिंकले आहेत. आजच्या सामन्याबाबतीत इनसाइड स्पोर्टने यॉट फाईट्सबाबत अतिशय अनोख्या पद्धतीने भविष्यवाणी केली आहे, त्यासाठी श्वानच्या मदतीने कोणता संघ जिंकेल याची भविष्यवाणी केली. यासाठी एका बॉक्सवर मुंबई इंडियन्स आणि दुसऱ्या बॉक्सवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर स्टिकर्स लावण्यात आले. हा एक चॅरेटी इव्हेंट असल्याचे सांगितले जात आहे. ज्या डब्याकेड जास्त श्वान आकर्षित होतील तोच संघ आजच्या सामन्यात विजयी असेल. याचा व्हिडीओ समोर आला आहे.
Who let the dogs out??
Paul the octopus became famous for predicting football matches for World Cup 2010. Now it’s our dogs’ time
We will do IPL predictions with the help of our most “Loyal” group of fans
For this video we will be making a donation to “Animal Matter… pic.twitter.com/Oq33EdN1rl
— InsideSport (@InsideSportIND) April 10, 2024
या व्हिडीओमध्ये पाहिलं तर, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये श्वानाने मुंबई इंडियन्सला पसंती दर्शवली असल्याचे पाहायला मिळत आहे. श्वानाचा हा प्रकार अतिशय मनोरंजक आणि अनोखा राहिलाआहे. श्वानच्या मदतीने केलेली भविष्यवाणीच्या या अनोख्या प्रयोगाला हास्यपद अन् पोरखळ म्हटलं जाऊ शकतं. एकंदरीत श्वानच्या भविष्यवाणीनंतर आजचा सामना कोण जिंकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे?
इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, रोमॅरियो शेफर्ड, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह.
विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, सौरव चौहान, कॅमेरॉन ग्रीन, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), रीस टोपले, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल.