IPL 2024 MI Vs SRH Match Playing 11 : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आज हार्दिक पांड्याची मुंबई इंडियन्स (Mumbai Indins) आणि पॅट कमिन्सची (Pat Cummins) सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आमने सामने असणार आहेत. मुंबईच्या वानखेडे मैदानावर (Wankhede Stadium) संध्याकाळी 7.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. या सामन्यात धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कारण दोन्ही संघांमध्ये स्फोट फलंदाज आहेत. सनरायजर्स हैदराबादने आयपीएलच्या यंदाच्या हंगमात तब्बल 3 वेळा 250 हून अधिक धावा केल्या आहेत.
मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदाराबाद यंदाच्या हंगामात दुसऱ्या आमने सामने येणार आहेत. याआधी झालेल्या पहिल्या सामन्यात इतिहास रचला गेला होता. 27 मार्चला झालेल्या सामन्यात हैदाराबादने 3 विकेट गमावत 277 धावा केल्या होत्या. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वोच्च धावसंख्या होती. याला उत्तर देताना मुंबई इंडियन्सने 5 विकेट गमावत 246 धावा केल्या होत्या. आता पुन्हा एकदा दोन्ही संघाता हाय स्कोरिंग सामना होईल अशी क्रिकेट चाहत्यांना अपेक्षा आहे.
मुंबई-हैदराबाद हेड-टू-हेड
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद संघाची कामगिरी पाहिली तर मुंबई इंडियन्सचं पारडं जड आहे. दोन्ही संघा आतापर्यंत 22 वेळा आमने सामने आले आहेत. यातल्या तब्बल 12 सामन्यात मुंबईने विजय मिळवलाय. तर 10 सामन्यात हैदराबादने बाजी मारली आहे. गेल्या पाच सामन्यांचा रेकॉर्ड पाहिला तर मुंबई इंडियन्स हैदराबादवर भारी पडली आहे. पाच पैकी तीन सामन्यात मुंबईने विजय मिळवला. तर दोन सामने हैदराबादने जिंकलेत.
मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेईंग 11
ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहाल वढेरा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, टिम डेविड, गेराल्ड कोएत्जी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा
सनरायजर्स हैदराबादची संभाव्य प्लेईंग 11
अभिषेक शर्मा, ट्रेविस हेड, अनमोलप्रीत सिंह, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, नीतीश रेड्डी, शाहबाज अहमद, मार्को जानसेन, पॅट कमिंस (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, टी नटराजन.
दोन्ही संघांची पॉईंटटेबल स्थिती
आयपीएल पॉईंटटेबलमध्ये सनरायजर्स हैदराबाद चौथ्या क्रमांकावर आहे. हैदराबादने दहा सामन्यांपैकी सहा सामन्यात विजय मिळवला असून त्यांच्या खात्यात 12 पॉईंट जमा आहेत. त्यांचा हा अकरावा सामना असून प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी मुंबईविरुद्धचा सामना जिंकण्याचा हैदराबादचा प्रयत्न असेल. तर मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमधलं स्थान जवळपास संपुष्टात आलं आहे. मुंबई पॉईंटटेबलमध्ये तळाला म्हणजे दहाव्या स्थानावर आहे. मुंबईला अकरा सामन्यांपैकी आठ सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.