IPL 2024 : हार्दिक पांड्याकडून काढून घेणार Mumbai Indians ची कॅप्टन्सी? माजी खेळाडूने सांगितलं - रोहित पुन्हा कॅप्टन होणार...!

Manoj Tiwari on Hardik Pandya : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्या याला वानखेडे स्टेडियमवर मुंबईच्या (Mumbai Indians) चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. अशातच आता खराब परफॉर्मन्समुळे पांड्याची कॅप्टन्सी काढली जाण्याची शक्यता माजी खेळाडूने वर्तविली आहे.

सौरभ तळेकर | Updated: Apr 2, 2024, 04:09 PM IST
IPL 2024 : हार्दिक पांड्याकडून काढून घेणार Mumbai Indians ची कॅप्टन्सी? माजी खेळाडूने सांगितलं - रोहित पुन्हा कॅप्टन होणार...! title=
Manoj Tiwari on Hardik Pandya

IPL 2024 Mumbai Indians Captain : रोहित शर्माला नारळ देऊन हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सला सलग तिसऱ्या सामन्यात पराभवाचं तोंड पहावं लागलं. मुंबई इंडियन्सचा सलग तिसऱ्या सामन्यात पराभव झालाय. सामन्यातील विजय लांबची गोष्ट पण मुंबईचा संघ लढताना देखील दिसत नाहीये. अशातच आता हार्दिकच्या कॅप्टन्सीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहेत. त्यामुळे पांड्याची कॅप्टन्सी काढून पुन्हा रोहितकडे जबाबदारी दिली जाणार की काय? असा सवाल विचारला जात आहे. अशातच आता टीम इंडियाचा माजी खेळाडू मनोज तिवारी याने असं काही म्हटलंय की, क्रिडाविश्वास खळबळ उडाली आहे.

काय म्हणाला मनोज तिवारी?

मी खूप मोठी गोष्ट सांगतोय, मुंबई इंडियन्सला सहा दिवसांचा ब्रेक मिळाला आहे. पुढच्या सामन्यापूर्वी, असं देखील होऊ शकतं की या सहा दिवसांत हार्दिक पांड्याचे कर्णधारपद गमवावं लागू शकतं. हार्दिककडून कर्णधारपदाच्या चुका झाल्या आहेत. प्रत्येक सामन्यात हे दिसून येतंय. गोलंदाजांमध्ये बदल असोत किंवा फलंदाजीच्या क्रमात झालेले बदल, त्यामुळे मुंबईचे कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवले जाऊ शकते. मला वाटते की मुंबई इंडियन्सचे मालक निर्णय घेण्यास मागेपुढे पाहत नाहीत. रोहितने पाच आयपीएल जेतेपदे जिंकली असतानाही त्याने रोहितकडून कर्णधारपद काढून हार्दिक पांड्याला देण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधार बदलणे हा मोठा निर्णय आहे, असं मनोज तिवारीने म्हटलं आहे.

सेहवाग म्हणतो...

मनोज तिवारीच्या या भविष्यवाणीला लगेच शेजारी बसलेल्या वीरेंद्र सेहवागने काऊंटर केलं. मला वाटतं मनोज तिवारी मोठी गोष्ट बोलत आहेत. माझं मत विचारात घेतलं तर पांड्याला लगेच कॅप्टन्सीवरून काढू शकणार नाहीत. कारण रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स सलग 5 सामने हारली आहे. त्यामुळे मला वाटत नाही की मुंबईचा संघ एवढ्या लवकर निर्णय घेईल, असं वीरेंद्र सेहवागने म्हटलं आहे.

कालच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा 6 गडी राखून धुव्वा उडवला अन् पाईंट्स टेबलच्या टॉपवर उडी घेतली आहे. राजस्थानसाठी रियान पराग (Riyan Parag) याने दमदार अर्धशतक ठोकलं. तर गोलंदाजीत ट्रेंड बोल्टने (Trent Boult) 3 विकेट्स घेत मुंबईच्या फलंदाजीची कंबर मोडली. मुंबईकडून आकाश मधवालने (Akash Madhwal) 3 विकेट्स घेतल्या पण राजस्थानने मुंबईने दिलेलं 126 धावांचं आव्हान आरामात पूर्ण केलं.

मुंबई इंडियन्सचा संघ - (Mumbai Indians Squad)

इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (C), टिम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला, आकाश मधवाल, जसप्रीत बुमराह, क्वेना मफाका, देवाल्ड ब्रेविस, रोमॅरियो शेफर्ड, नुवान तुषारा, नेहल वधेरा , शम्स मुलानी, मोहम्मद नबी, सूर्यकुमार यादव, श्रेयस गोपाल, ल्यूक वुड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, कुमार कार्तिकेय, शिवालिक शर्मा, अंशुल कंबोज.