SRH vs RCB head to head: आयपीएलच्या 17 व्या हंगामातील 41 वा सामना आज (25 एप्रिल 2024) सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल. तर नाणेफेक संध्याकाळी ७ वाजता होणार आहे. आरसीबीचे नेतृत्व फाफ डू प्लेसिसकडे असेल. तर पॅट कमिन्सकेड एसआरएचची सूत्र असणार आहेत.
हैदराबादचा हा आठवा आणि आरसीबीचा नववा सामना आहे. हैदराबादने 5 पैकी 7 सामने जिंकले आहेत. तर आरसीबी 9 पैकी फक्त 1 सामन्यात विजयी होता आलं आहे. त्यामुळे आता आरसीबीचा प्रयत्न विजयी ट्रॅकवर परतण्याचा असणार आहे. आतापर्यंत आयपीएलमध्ये हैदराबादने चार वेळा 200 च्या वर ,तर तीन वेळा 250 वर धावसंख्या केली आहे. तर आज हैदराबाद 300 ची धावसंख्या करणार का? तर दुसरीकडे बंगळुरूच्या संघाचा आतापर्यंत सात पराभवानंतर त्यांची प्रत्येक लढत त्यांच्यासाठी आव्हान कायम राखण्यापेक्षा प्रतिष्ठा कायम राखण्याच्या दृष्टीने महत्त्वाची असणार आहे.
सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात आतापर्यंत 24 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये सनरायझर्स हैदराबादने 13 सामने जिंकले असून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 10 सामने जिंकले आहेत. नुकत्याच खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात हैदराबाद संघाने IPL मधील सर्वोच्च 287 धावा केल्या.
हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल मानली जाते. या मैदानावर चौकार आणि षटकारांचा पाऊस पडतो. हे मैदान लहान असण्याचेही कारण आहे. या मोसमात हैदराबाद संघानेही या मैदानावर 277 धावांची मोठी धावसंख्या उभारली आहे. अशा स्थितीत आजच्या सामन्यातही मोठ्या प्रमाणावर धावा होण्याची अपेक्षा आहे.
सनरायझर्स हैदराबादः ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, नितीश कुमार रेड्डी, शाहबाज अहमद, अब्दुल समद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, टी नटराजन.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर: विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विल जॅक, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल.