IPL Auction 2021: 'या' खेळाडूंवर कोट्यवधींची बोली, थोड्याच वेळात लिलाव

 IPL लिलावाच्या मौसमात 292 खेळाडूंमध्ये 164 भारतीय खेळाडू तर 125 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. तर 3 असोसिएट खेळाडूचा समावेश असणार आहे. 

Updated: Feb 18, 2021, 02:06 PM IST
IPL Auction 2021: 'या' खेळाडूंवर कोट्यवधींची बोली, थोड्याच वेळात लिलाव title=

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगसाठी आज दुपारी 3 वाजता लिलाव सुरू होणार आहे. या लिलावाकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. भारताचा ज्येष्ठ ऑफस्पिनर हरभजन सिंग आणि मध्यम ऑर्डरचा फलंदाज केदार जाधव यांच्या व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यावर कोट्यवधींची बोली लागणार असल्याचं सांगितलं जात आहे. 

विदेशी खेळाडूंमध्ये 292 खेळाडूंपैकी ऑस्ट्रेलियाचे 35, न्यूझिलंडचे 20, वेस्टइंडीजचे 19, इंग्लंडचे 17, दक्षिण अफ्रिकेचे 14, श्रीलंकेचे 9, अफगाणीस्तानचे 7 तर नेपाळ, यूएई आणि अमेरिकेच्या प्रत्येकी एक खेळाडूचा समावेश असणार आहे. IPL लिलावाच्या मौसमात 292 खेळाडूंमध्ये 164 भारतीय खेळाडू तर 125 परदेशी खेळाडूंचा समावेश असणार आहे. तर 3 असोसिएट खेळाडूचा समावेश आहे. 

यावेळी लिलावात असे 10 खेळाडू आहेत ज्यांची बेस किंमत 2 कोटी आहे. त्यामध्ये दोन भारतीय खेळाडूंचा समावेश असणार आहे. त्यात हरभजन सिंग, केदार जाधव, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ, साकिब अल हसन, मोईन अली, सॅम बिलिंग्ज, लियाम प्लंकेट, जेसन रॉय आणि मार्क वुड यांचा समावेश आहे. त्याच वेळी, असे 12 खेळाडू आहेत, ज्यांची बेस प्राइस 1.5 कोटी रुपये असणार आहे.  तर 1 कोटी किंमतीची बोल लागणाऱ्या खेळाडूंमध्ये 11 जणांचा समावेश आहे. 

कोणत्या संघाकडे किती पैसे?
किंग्ज इलेव्हन पंजाब सर्वाधिक 53.20 कोटी रुपयांसह लिलावासाठी उतरणार आहे. तर दुसऱ्या स्थानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू असेल. केकेआर आणि सनरायझर्स हैदराबाद सर्वात कमी 10.75 कोटीसह लिलावात सामील होतील. राजस्थान रॉयल्सकडे 34.85 कोटी रुपयांची आहेत. त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्जकडे 22.90 कोटी तर दिल्ली कॅपिटलची 12.90 कोटी आणि मुंबई इंडियन्सची 15.35 कोटी रुपये आहेत. 

आयपीएलसाठी आज दुपारी तीन वाजता चेन्नईमध्ये लिलावासाठी सुरुवात होणार आहे. यंदाच्या हंगामात सर्वाधिक बोली 10 कोटींहून अधिक लागू शकते अशी शक्यताही व्यक्त केली आहे. त्यामुळे या लिलावाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.