IPL Mega Auction 2022 : आयपीएल मेगा ऑक्शन 2022 आजपासून बंगळुरूमध्ये सुरु झाला आहे. दोन दिवस चालणाऱ्या या लिलावात पहिल्या सत्रात फ्रँचायझींकडून स्टार खेळाडूंवर बोली लावली जात आहे. बोलीची सुरुवात झाली तीच भारताचा स्टार ओपनर शिखर धवनच्या (Shikhar Dhavan) बोलीने.
शिखर धवनची बल्ले बल्ले
दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) प्रथम शिखर धवनसाठी बोली लावली, त्यानंतर राजस्थान रॉयल्सने (Rajsthan Royals) सुरुवात केली. शिखर धवनसाठी दिल्ली आणि राजस्थान यांच्यात चढाओढ रंगली. पण अचानक पंजाब किंग्सने (Punjab Kings) शिखर धवनवर 8.25 कोटींची बोली लावत दिल्ली आणि राजस्थानवर मात केली. शिखर धवनच्या सहभागामुळे मयंक अग्रवालला (Mayank Agrawal) त्याचा सलामीचा जोडीदार सापडला आहे. पंजाब संघात धवन मयांकबरोबर ओपनिंग करताना दिसू शकतो.
शिखर धवन जबदस्त फॉर्मात
भारताच्या धोकादायक सलामीवीरांपैकी एक असलेला शिखर धवन सध्या चांगलाच फॉर्मात आहे. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना धवनने खोऱ्याने धावा केल्या आहेत. दिल्ली कॅपिटल्सबरोबरच त्याने भारतीय संघालाही अनेकवेळा चांगली सुरुवात करुन दिली आहे. पंजाब किंग्सलाही चांगल्या सलामीवीराची गरज होती. त्यामुळे पंजाबने शिखर धवनसाठी सर्वाधिक बोली लावली.
शिखर धवनने आयपीएलमध्ये आतापर्यंत १९२ सामन्यात ५ हजार ७२८ धावा केल्या आहेत. शिखर धवनने याआधी हैदराबाद संघाचंही नेतृत्व केलं आहे.
धवनला मिळू शकते कर्णधारपदाची धूरा
शिखर धवनच्या समावेशाने पंजाब किंग्जला दोन फायदे होणार आहेत. सलामी खेळाडूबरोबरच संघाचं कर्णधारपद मिळू शकतं. शिखर धवनने याआधी सनरायजर्स हैदराबादचं नेतृत्व केलं आहे. त्याच्या कर्णधारपदाच्या अनुभवाचा पंजाबला चांगलाच फायदा होणार आहे. पंजाब किंग्जला आतापर्यंत एकदाही आयपीएलचं जेतेपद पटकावता आलेलं नाही.
आर अश्विनही ठरला यशस्वी
दुसरीकडे भारताचा हुकमी स्पीन बॉलर रविचंद्रन अश्विनवरही पहिल्या सत्रात चांगली बोली लागली. दोन कोटी बेस प्राईज असलेल्या आर अश्विनवर राजस्थान रॉयल्सने पाच कोटींची बोली लावत आपल्या संघात सहभागी करुन घेतलं