IPL Auction 2022: यंदा या कारणामुळे IPL लिलावापासून दूर राहणार प्रीती झिंटा

आयपीएल लिलावादरम्यान नेहमीच चर्चेचा विषय राहणारी प्रीती यंदा IPL Mega Auction मध्ये दिसणार नाहीये. याबाबत तिने स्वत:  खुलासा केला आहे. यंदा ही आयपीएल लिलाव मिस करणार असल्याचं देखील तिने म्हटलं आहे. ज्यामुळे तिचे चाहते देखील तिला मिस करणार आहेत.

Updated: Feb 12, 2022, 01:57 PM IST
IPL Auction 2022: यंदा या कारणामुळे IPL लिलावापासून दूर राहणार प्रीती झिंटा title=

IPL Mega Auction 2022 : पंजाब किंग्जची मालकीन आणि अभिनेत्री प्रीती झिंटा (Preity Zinta) यंदा आयपीएलच्या लिलावात दिसणार नाहीये. याबाबत तिने स्वत: खुलासा केला आहे. शुक्रवारी प्रीतीने आपल्या इन्स्टाग्रामवर याबाबत माहिती दिली. त्यामुळे आयपीएल लिलावात (IPL Auction ) नेहमी चर्चेत राहणापी प्रीती झिंटा यंदा चाहत्यांना दिसणार नाहीये.

प्रीतीने म्हटलं की, ती यंदा आयपीएलचा लिलाव मिस करणार आहे. कारण तिला तिच्या जुळ्या मुलांची काळजी घ्यायची आहे. तिने पोस्टमध्ये म्हटलं की 'या वर्षी ती आयपीएलचा लिलाव मिस करणार आहे. कारण ती तिच्या लहान मुलांना सोडून भारतात येऊ शकणार नाही.'

आयपीएल लिलावात प्रीती झिंटा ही नेहमीच दिसते. प्रत्येक सीजनमध्ये तिचा सहभाग राहिला आहे. त्यामुळे तिचे चाहते देखील तिला नक्कीच मिस करणार आहेत. आयपीएल 2022 मध्ये तिचा संघ कोणत्या कोणत्या खेळाडूंना संघात घेतो याकडे ही सगळ्यांचं लक्ष असणार आहे.

पंजाब किंग्सने मयंक अग्रवालला (Mayank Agrawal) 12 कोटींमध्ये रिटेन केलं आहे. मयंक अग्रवालने आयपीएल 2021 मध्ये पंजाबसाठी 140.45 च्या स्ट्राईक रेटने 441 रन केले आहेत. मयंकला टीमने नंबर एकचा खेळाडू म्हणून रिटने केले आहे.