बंगळुरु : आयपीएल 15 व्या मोसमासाठीचा मेगा ऑक्शन (Ipl Mgea Auction 2022) लिलावादरम्यान ऑक्शनर ह्यूज एडमीड्स (Hugh Edmeades) चक्कर येऊन कोसळले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. सुदैवाने यात त्यांना कोणतीही इजा झाली नसून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. लिलावावेळी हा असा प्रकार घडल्याने काही मिनिटांसाठी लिलाव थांबवण्यात आला. (ipl mega auction 2022 day 1 charu sharma will continue with auction proceedings today due to hugh edmeades collapses during auction)
दरम्यान ह्यूज एडमीड्स यांच्यावर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे. लिलाव थांबू नये यासाठी आता लिलावाची जबाबदारी ही चारु शर्मा (Charu Sharma) यांच्याकडे देण्यात आली आहे. आयपीएलने प्रशासनाने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
Mr. Hugh Edmeades, the IPL Auctioneer, had an unfortunate fall due to Postural Hypotension during the IPL Auction this afternoon.
The medical team attended to him immediately after the incident & he is stable. Mr. Charu Sharma will continue with the Auction proceedings today. pic.twitter.com/cQ6JbRjj1P
— IndianPremierLeague (@IPL) February 12, 2022