Ipl Mega Auction 2022 | एकही सामना न खेळता Arjun Tendulkar चा 'भाव' वाढला

आयपीएलच्या 15 व्या मोसमाचं 2 दिवसीय मेगा ऑक्शन (Ipl Mega Auction 2022) पार पडलं आहे.  

Updated: Feb 13, 2022, 10:47 PM IST
Ipl Mega Auction 2022 | एकही सामना न खेळता Arjun Tendulkar चा 'भाव' वाढला title=
छाया सौजन्य : मुंबई इंडियन्स ट्विटर

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमाचं 2 दिवसीय मेगा ऑक्शन (Ipl Mega Auction 2022) पार पडलं आहे. या 2 दिवसांच्या मेगा ऑक्शनमध्ये अनेक खेळाडू कोट्यधीश झाले आहेत. खेळाडूंवर फ्रँचायजीने पैशांचा पाऊस पाडला. तर काहींच्या पदरी निराशा पडली. काही खेळाडूंना त्यांच्या चांगल्या कामगिरीचं फल मिळालं. तर काहींना पुढच्या वर्षाची वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जून तेंडुलकरचा (Arjun Tendulkar) भाव मात्र वाढला आहे. विशेष म्हणजे गत मोसमात एकही सामना न खेळता अर्जूनला चढा दर मिळाला आहे. (ipl mega auction 2022 day 2 sachin tendulkar son arjun Tendulkar bought by mumbai indians in 30 lakh ruppes)

यंदाही मुंबई इंडियन्सनेच अर्जूनला आपल्या ताफ्यात घेतलं. मुंबई फ्रँचायजीने अर्जूनसाठी गत मोसमाच्या लिलावापेक्षा 10 लाख अधिकचे मोजले आहेत. मुंबईने अर्जूनला 30 लाख रुपये मोजून आपल्याकडे घेतलं आहे. 

अर्जून गत मोसमात नेट बॉलर म्हणून फलंदाजांसह सराव करत होता. अर्जूनला गेल्या मोसमात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. मात्र या मोसमात अर्जूनला आयपीएलमध्ये पदार्पणाची संधी मिळणार की नाही, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.