IPL Auction 2022 : आयपीएलच्या गेल्या हंगामात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने (Harshal Patel) सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये (IPL 2022 Auction) हर्षल पटेलवर 10 कोटींहून अधिक बोली लागली. विशेष म्हणजे हर्षल पटेलला आपल्या संघात घेण्यासाठी फ्रँचाईझीमध्येही चांगलीच चुरस रंगली.
हर्षल पटेल आयपीएल 2022 मध्ये पुन्हा एकदा रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून (Royal Challengers Bangalore) खेळताना दिसणार आहे. आरसीबीने हर्षलसाठी तब्बल 10.75 कोटींची तगडी बोली लावली. हर्षल पटेलला संघात सहभागी करुन घेण्यासाठी सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरमध्ये चांगलीच चुरस रंगली होती. अखेर बंगलोरने यात बाजी मारली.
आयपीएल 2021 हंगामानंतर बंगलोरने हर्षलला रिटेन केलं नव्हतं. पण आता पुन्हा त्याच्यावर पाच पट जास्त बोली लावत आपल्या संघात घेतलं आहे. 2021 हंगामात हर्षलला दोन कोटी रुपये मिळाले आहेत.
वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने गेल्या हंगामात सर्वाधिक विकेट घेत पर्पल कॅप पटकावली होती.
जेसन होल्डर लखनऊ संघात
वेस्टइंडिजचा दिग्गज ऑलराऊंडर जेसन होल्डर लखऊन सुपरजायंटसमधून खेळताना दिसणार आहे. लखनऊने होल्डरवर 8.75 कोटी रुपयांची बोली लावली.
नितीश राणावर ८ कोटींची बोली
युवा स्टार बॅटस्मन नितीश राणा पुन्हा एकदा केकेआर संघात खेळणार आहे. केकेआरने नितीश राणावर 8 कोटींची बोली लावत आपल्या संघात सहभागी करुन घेतलं.
सीएसकेने ब्राव्होला ठेवलं कायम
वेस्टइंडिजचा स्टार ऑलराऊंजर ड्वेन ब्रावो पुन्हा एकाद महेंद्रसिंग धोणीबरोबर चेन्नई सुपर किंग्जमध्ये खेळताना दिसणार आहे. ब्रावोवर 4.40 कोटी रुपयांची बोली लावण्यात आली.
पडीक्कल RCBतून राजस्थानमध्ये
आरसीबीसाठी दमदार कामगिरी करणारा देवदत्त पडिक्कल यंदाच्या हंगामात राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दिसेल. राजस्थान रॉयल्सने देवदत्त पडिक्कलसाठी 7.75 कोटी मोजले आहेत.
उथप्पा, जेसन रॉयवर २ कोटींची बोली
भारताचा दिग्गज फलंदाज रॉबिन उथप्पावर सीएसकेने २ कोटींची बोली लावली. तर त्याच किंमतीत गुजरात टायटंनने जेसन रॉयला आपल्या संघात सहभागी करुन घेतलं.