मुंबई: IPL मध्ये सर्वात जास्त बोली लागलेल्या गोलंदाजावर ICC ने दंड लावला आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली. या खेळाडूला अंपायरच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं चांगलंच महागात पडलं.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउन्सिल (आयसीसी) च्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमिसन याला 15 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. आयसीसीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मंगळवारी बांगलादेश विरुद्धच्या दुसर्या वनडे सामन्यात आयसीसीच्या आचारसंहिता 2.8 चं उल्लंघन केल्याप्रकरणी जेमीसन दोषी असल्याचं ICCने सांगितलं आहे.
जेमिसनने 15 व्या ओव्हरदरम्यान टीव्ही अंपायरच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्याच्या निर्णयावर संतापही व्यक्त केला. जेमिसननं त्याच्यावर लावण्यात आलेले आरोप मान्य केले असून ICCने ठोठवलेला दंड भरावा लागणार आहे.
काईल जेमिसन IPLमध्ये विराट कोहलीच्या संघाकडून खेळणार आहे. RCB संघानं 15 कोटींची बोली लगावत त्याला संघात सामाविष्ट करून घेतलं आहे. जेमिसनला संघात घेण्यासाठी तीन संघात लिलावादरम्यान चुरस सुरू होती. RCBने मोठी किंमत देऊन त्याला संघात सामाविष्ट करून घेतलं आहे. 14 वर्षांच्या IPL च्या इतिहासात सर्वात जास्त बोली लावण्यात आलेला चौथा खेळाडू जेमिसन ठरला आहे. ICCने ठोठावलेल्या दंडामुळे त्याला चांगलाच दणका बसला आहे.