5 वर्षांनंतर IPLमध्ये ग्लॅन मॅक्सवेलची धुवाधार फलंदाजी, सोशल मीडियावर प्रिती झिंटा ट्रोल

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून सध्या दोन्ही सामन्यांमध्ये ग्लॅन मॅक्सवेल उत्तम खेळताना दिसला त्यानंतर प्रितीला ट्रोल केलं आहे.

Updated: Apr 15, 2021, 09:14 AM IST
5 वर्षांनंतर IPLमध्ये ग्लॅन मॅक्सवेलची धुवाधार फलंदाजी, सोशल मीडियावर प्रिती झिंटा ट्रोल title=

मुंबई: हैदराबाद विरुद्ध बंगळुरू सामना नुकताच चेपॉक स्टेडियमवर पार पडला. सहाव्या सामन्यात ग्लॅन मॅक्सवेलचा जलवा पाहायला मिळाला. रॉयल चेलेंजर्स बंगळुरूच्या सलग दुसऱ्या सामन्यात ग्लॅन मॅक्सवेलनं चांगली कामगिरी केली. त्याचा या वाढत्या फॉर्ममुळे चाहत्यांकडून त्यांचं कौतुक झालं. तर दुसरीकडे प्रिती झिंटाला ट्रोल करण्यात आलं आहे. 

आरसीबीकडून खेळताना ग्लेन मॅक्सवेलने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 41 चेंडूत 59 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने 5 चौकार आणि 3 षटकार लगावले. RCBला विजय मिळवून देण्यात मॅक्सवेलचा मोठा वाटा आहे. 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून सध्या दोन्ही सामन्यांमध्ये ग्लॅन मॅक्सवेल उत्तम खेळताना दिसत आहे. त्याच्या खेळीनंतर चाहत्यांनी प्रिती झिंटाला खूप जास्त ट्रोल केलं आहे. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ग्लॅन मॅक्सवेलनं 2016 नंतर म्हणजे 5 वर्षांनंतर अर्धशतक ठोकण्यात मॅक्सवेलला यश आलं आहे.

ग्लॅन मॅक्सवेलला प्रिती झिंटाचा संघ पंजाब किंग्समधून रिलिज करण्यात आलं होतं. रॉयल चॅलेंज संघानं त्याला लिलावादरम्यान संघात घेतलं. त्यामुळे चाहत्यांनी ग्लॅन मॅक्सवेलच्या यशस्वी फलंदाजीनंतर प्रिती झिंटाला ट्रोल केलं आहे.