IPL 2021: सलग दुसऱ्यांदा पराभव झालेल्यानंतर हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरची प्रतिक्रिया

सलग दोन सामन्यांमध्ये झालेल्या पराभवानंतर डेव्हिड वॉर्नरनं प्रतिक्रिया दिली आहे.

Updated: Apr 15, 2021, 05:23 PM IST
IPL 2021: सलग दुसऱ्यांदा पराभव झालेल्यानंतर हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरची प्रतिक्रिया title=

मुंबई: बंगळुरू विरुद्ध झालेल्या सामन्यात 6 धावांनी पराभव झाल्यानंतर हैदराबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने आपली चूक कुठे झाली याबाबत सांगितलं आहे. सलग दोन सामन्यांमध्ये झालेल्या पराभवानंतर डेव्हिड वॉर्नरनं प्रतिक्रिया दिली आहे.

सामना संपल्यानंतर वॉर्नर म्हणाला की, "आमच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. ग्लेन मॅक्सवेलने आरसीबीकडून चांगली फलंदाजी केली. मी खूप निराश आहे. स्पिनर्सच्या चेंडूवर आम्ही चांगली कामगिरी करू शकलो नाही. संघातील खेळाडूंच्या फलंदाजीवर वॉर्नरने नाराजी व्यक्त केली. 

पुढे वॉर्नर म्हणतो की, आमच्याकडे आणखी 3 सामने खेळण्याची संधी आहे. आम्ही झालेल्या चुकांवर काम करू आणि आम्ही पॉवर प्लेमध्ये विकेट घेण्याचा आणि मोठी भागीदारी निर्माण करण्याचा प्रयत्न करू असा विश्वास व्यक्त केला आहे. 

केकेआर विरुद्ध सामन्यात हैदराबाद संघाला पहिला पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर बंगळुरू विरुद्ध झालेल्या सामन्यात अवघ्या 6 धावांनी पराभवाचा सामना स्वीकारावा लागला. 

17व्या ओव्हरपर्यंत हैदराबाद संघाची पकड मजबूत होती. मात्र शाहबाजने केलेल्या तुफान गोलंदाजीनं एका ओव्हरला तीन विकेट्स गेल्या आणि हैदराबादच्या हातून सामना निसटला. 

हैदराबाद संघाचा पराभव पाहून काव्या मारनसह चाहत्यांनाही अश्रू अनावर झाले. हैदराबाद संघाला हा पराभव पचवणं कठीण जात असल्याची भावना डेव्हिड वॉर्ननं व्यक्त केली आहे.  

Tags: