IPL मध्ये 15 वर्षांनंतर होणार पुनरावृत्ती, माजी धडाकेबाज फलंदाजाची भविष्यवाणी

माजी धडाकेबाज फलंदाजाची भविष्यवाणी, 'मुंबई, चेन्नई नाही तर 'ही' टीम जिंकणार यंदा IPL ची ट्रॉफी'

Updated: Apr 3, 2022, 02:09 PM IST
IPL मध्ये 15 वर्षांनंतर होणार पुनरावृत्ती, माजी धडाकेबाज फलंदाजाची भविष्यवाणी title=

मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला सुरुवात झाली. या हंगामाच्या सुरुवातीपासून अनपेक्षित निकाल येत आहेत. सर्वात उत्तम टीम म्हणून चेन्नई आणि मुंबईकडे पाहिलं जात होतं. मात्र सुरुवातीपासून ह्या दोन्ही टीम बॅकफूटवर जात असल्याचं दिसत आहे. तर राजस्थान, पंजाब, हैदराबादची कामगिरी उत्तम राहिली आहे. 

आयपीएलमध्ये 5 वेळा ट्रॉफी जिंकलेल्या मुंबई टीमला यंदाच्या हंगामात अजून खातं उघडण्यात यश आलं नाही. तर दुसरीकडे जडेजाच्या हाती निराशा आली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये 10 टीम खेळत असून सामना चुरशीचा होत आहे.

माजी दिग्गज खेळाडूंनी यावेळी आपल्या अनुभवाच्या आधारावर यंदा आयपीएलची ट्रॉफी कोण जिंकणार याबाबत भाकीत सांगितलं आहे. कोण सांगितलं कोलकाता घेऊन जाणार तर कोण म्हणतं बंगळुरू नेणार. आता आयर्लंडच्या माजी फलंदाजाने भविष्यवाणी केली आहे. 

गेल्यावर्षीची ट्रॉफी चेन्नईने मिळवली होती. यंदा मात्र चेन्नई किंवा मुंबई नाही तर संजू सॅमसनची पिंक जर्सी आयपीएलची ट्रॉफी पटकवणार. आयर्लंडचा माजी धुरंधर फलंदाज नील ओ ब्रायनने ही भविष्यवाणी केली. 

राजस्थान ही ट्रॉफी जिंकण्याचे चान्सेस का?
यंदाच्या हंगामात राजस्थान टीम सर्वात मजबूत आहे. कॅम्पमध्ये प्रत्येक खेळाडू खुश आहे. फलंदाजीमध्ये सुरुवातीची फळी मजबूत आहे. तर पाच आणि सहाव्या क्रमांकावर चांगले शॉट खेळणारे आहेत. त्यामुळे टीममधील संतुलन ढासळत नाही. 

बटलर आणि सॅमसन चांगल्या पद्धतीनं सेट करत असतील तर त्यांचा फलंदाजीसाठी सर्वात उत्तम क्रम असेल. अश्विन आणि चहल मॅच विनर आहेत. ते आपल्या कामगिरीनं कधी बाजी उलटवतील याचा अंदाजही लागणार नाही. दोन्ही सामन्यामध्ये संजूने टॉस जिंकला नाही पण सामना जिंकला. 

राजस्थानचा मुंबईवर रोमांचक विजय
जोस बटलरच्या झंझावाती शतकानंतर, राजस्थानने मुंबई इंडियन्सचा 23 धावांनी पराभव केला. राजस्थान टीमने सलग दुसरा विजय नोंदवला. पहिल्यांदा फलंदाजी करून राजस्थाननं 194 धावांचं लक्ष्य मुंबईसमोर ठेवलं. मुंबईच्या खेळाडूंना 170 धावांवर रोखण्यात राजस्थानला यश आलं. 

मुंबईचा हा दुसरा पराभव आहे. बटलरने 68 बॉलमध्ये 11 चौकार आणि 5 षटकार मारले. त्याला कर्णधार संजू सॅमसन (30) आणि शिमरॉन हेटमायर (35) यांची चांगली साथ मिळाली. एकंदरीत यावेळी स्पर्धा खूप चुरशीची आहे आणि राजस्थान, पंजाब टीम अधिक मजबूत होताना दिसत आहेत.