Ishan Kishan brutally beaten by an angry mob : बांगलादेशाविरूद्धच्या तिसऱ्या वनडे (IND vs BAN 3rd ODI) सामन्यात ईशान किशन (Ishan Kishan) ने डबल सेंच्युरी मारली. यामुळे सोशल मिडियावर (Social Media) त्याच्या नावाची एकच चर्चा रंगली आहे. आजच्या सामन्यात ईशान किशनची बॅट तळपली असून 210 रन्सची उत्तम खेळी त्याने केली. 24 वर्षीय ईशान किशन पर्सनल लाईफबद्दलही अनेकांना जाणून घेण्याची इच्छा असते. अशातच ईशान किशन संबधी एक अशी घटना आहे, जी फार कमी चाहत्यांना माहीत असेल.
ही गोष्ट 2016 ची आहे, एका छापून आलेल्या न्यूजनुसार, एका जमलेल्या गर्दीने इशान किशनला रस्त्यावर खूप सुनावलं होतं. ही पूर्ण घटना अशी आहे की, ईशान एकदा भरधाव वेगाने त्याची गाडी घेऊन जात होता. त्यावेळी त्याने एका ऑटो रिक्शाला ठोकलं होतं. या दुर्घटनेमध्ये रिक्षा चालकाला गंभीर दुखापत झाली होती.
या चुकीनंतर तिथे जमलेल्या लोकांच्या गर्दीला संताप अनावर झाला. यानंतर तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी त्याला बेदम मारहाण केली होती. या घटनेची पोलिसांमध्ये तक्रार देखील करण्यात आली होती. त्यावेळी तो अंडर 19 चा कर्णधार असून त्याची चौकशी करण्यात आली होती. दरम्यान हे प्रकरण गंभीर नसल्याने ईशानला सोडून देण्यात आलं.
टीम इंडियाचा स्टार आणि युवा फलंदाज ईशान किशनने (ishan kishan) बांगलादेश विरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात खणखणीत द्विशतक ठोकले आहे. ईशानने 131 बॉलमध्ये हे द्विशतक मारले आहे. ही मोठी खेळी करून त्याने टीम इंडिय़ाचा कर्णधार रोहित शर्माचा मोठा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. बांगलादेश (bangladesh) विरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात ईशान किशनने (ishan kishan) द्विशतक ठोकलं. या खेळीत त्याने 24 फोर आणि 10 सिक्स मारले आहेत. त्याच्या या खेळीने टीम इंडिया सर्वांच्च धावसंख्येपर्यंत पोहोचली आहे.
रोहितने (Rohit sharma) वनडे सामन्यात तीनदा सर्वांच्च स्कोर केला आहे. यामध्ये त्याने एकदा 208 तर दुसऱ्यांदा 209 धावा ठोकल्या होत्या. तर ईशान किशनने (ishan kishan) बांगलादेश विरूद्ध डबल सेंच्यूरी (Double Century) ठोकून रोहितचा रेकॉर्ड मोडला आहे.ईशानने 160 च्या स्ट्राईकने 210 धावा ठोकल्या आहेत. त्यामुळे ईशानने 208 आणि 209 धावा ठोकल्याचा विक्रम मोडलाय. विशेष म्हणजे 131 इनिंग्समध्ये त्याने डबल सेंच्यूरी ठोकली आहे. तर रोहितने 153 इनिंगमध्ये डबल सेंच्यूरी ठोकली होती.