21 कसोटी आणि 15 वनडे सामने खेळले, मात्र या कारणामुळे स्टार खेळाडूनं घेतला संन्यास

'मला जे करायचं होतं तसं झालं नाही', 21 कसोटी, 15 वन डेमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या स्टार खेळाडूनं घेतली निवृत्ती

Updated: Oct 20, 2021, 09:06 PM IST
21 कसोटी आणि 15 वनडे सामने खेळले, मात्र या कारणामुळे स्टार खेळाडूनं घेतला संन्यास title=

मुंबई: क्रिकेट विश्वामध्ये ज्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली तोच स्टार खेळाडू काहीसा हताशही झाला. या खेळाडूनं आपल्या दुखापतीनंतर क्रिकेटमधून संन्यास घेण्य़ाचा निर्णय घेतला आहे. त्याने क्रिकेटमधून संन्यास घेण्याची घोषणा केल्यानंतर क्रिकेटप्रेमींची मोठी निराशा देखील झाली. 21 कसोटी सामने आणि 15 वन डे सामन्यात या खेळाडूनं चांगली कामगिरी केली होती. 

क्रिकेटमधून संन्यास घेण्याच्या घोषणेनंतर ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिन्सनं संन्यास घेण्याबाबत घोषणा केली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये व्हिक्टोरियासाठी खेळताना पॅटिन्सन जखमी झाला. त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. या दुखापतीनंतर त्याने क्रिकेटमधून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

एका वेबसाईटवर पॅटिन्सननं दिलेल्या मुलाखतीनुसार पॅटिन्सन म्हणाला की, मला पुढच्या सत्रात जी तयारी करायची आहे तशी तयारी झाली नाही. मला सध्या माझं मन आणि शरीरासोबत लढावं लागत आहे. याचं कारण म्हणजे मला झालेली दुखापत आहे. त्यामुळे ही स्थिती माझ्यासाठी आणि माझ्या टीमसाठी चांगली नाही. असंही यावेळी तो म्हणाला. 

पॅटिन्सननं शेवटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सामना हा 2020 मध्ये खेळला होता. त्याने आपल्या करियरमध्ये 81 कसोटी सामन्यांमध्ये 16 विकेट्स घेतल्या. 2020 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या सामन्यात तो शेवटचं खेळला होता. 15 वन डे सामन्यात पॅटिन्सननं 16 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये 10 सामने खेळून 11 विकेट्स घेतल्या आहेत.