Jasprit Bumrah: तिच स्टाईल अन् तोच जोश, कमबॅकनंतर दुसऱ्याच बॉलवर बुमराहने उडवल्या दांड्या; पाहा Video

Jasprit Bumrah Comeback: पहिल्याच ओव्हरमध्ये बुमराहने जलवा दाखवला अन् जस्सी इज बॅक असा संदेश सर्वांना पाठवला आहे. आयर्लंडविरुद्ध बुमराहने पहिल्याच ओव्हरमध्ये दोन विकेट काढल्या. त्याचा व्हिडीओ (Viral Video) सध्या तुफान व्हायरल होत आहे.  

Updated: Aug 18, 2023, 07:55 PM IST
Jasprit Bumrah: तिच स्टाईल अन् तोच जोश, कमबॅकनंतर दुसऱ्याच बॉलवर बुमराहने उडवल्या दांड्या; पाहा Video title=
Jasprit Bumrah, ,IND vs IRE 1st T20

India vs Ireland 1st T20: भारत आणि आयर्लंड यांच्यात आजपासून म्हणजेच 18 ऑगस्टपासून तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेत दुखापतीतून सावरणाऱ्या जसप्रीत बुमराहवर (Jasprit Bumrah) निवड समितीसह सर्वांचं लक्ष होतं. मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये बुमराहने जलवा दाखवला अन् जस्सी इज बॅक असा संदेश सर्वांना पाठवला आहे. आयर्लंडविरुद्ध बुमराहने पहिल्याच ओव्हरमध्ये दोन विकेट काढल्या. त्याचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

टीम इंडियाकडून आयर्लंड दौऱ्यात प्रसिद्ध कृष्णा आणि रिंकू सिंग यांना टी-20 पदार्पणाची संधी मिळाली आहे. सोबतच जसप्रीत बुमराह देखील 10 महिन्यांपेक्षा अधिक काळानंतर संघात पुनरागमन करत आहे. अशातच पहिल्या बॉलवर फोर बसल्यानंतर बुमराहने दुसऱ्याच बॉलवर सलामीवीर अँड्र्यू बालबर्नीचा बोल्ड काढला. तर पाचव्या बॉलवर लॉर्कन टकरला देखील बाद केलं.

पाहा Video

पाहा प्लेईंग XI

आयर्लंड (प्लेइंग इलेव्हन): पॉल स्टर्लिंग (C), अँड्र्यू बालबर्नी, लॉर्कन टकर (WK), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, मार्क अडायर, बॅरी मॅकार्थी, क्रेग यंग, ​​जोशुआ लिटल, बेंजामिन व्हाइट.

भारत (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (WK), टिळक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह (C), रवी बिश्नोई.

काय म्हणतो जसप्रीत बुमराह?

इथं आल्याचा खूप आनंद झाला. इथलं हवामान सुंदर दिसतंय. मला बरं वाटतंय आणि मी क्रिकेट खेळायला उत्सुक आहे. आपण काय गमावत आहात याची जाणीव होते, परत आल्याने खूप आनंद झालाय. आम्हाला आयर्लंडकडून लढतीची अपेक्षा आहे. एक वेगवान गोलंदाज म्हणून मला आशा आहे की खेळपट्टी काहीतरी चमत्कार दाखवेल. टीम इंडियाकडून रिंकू आणि प्रसिद्ध कृष्णा असे दोन पदार्पण आहेत. त्यांना फक्त त्यांच्या क्रिकेटचा आनंद घेण्यास सांगितलं, असं बुमराहने टॉसवेळी म्हटलं आहे.