आशियाई स्पर्धा २०१८: भारताच्या जॉनसनला सुवर्ण पदक

भारताचा धावपटू जिनसन जॉनसनला १८व्या आशियाई स्पर्धा २०१८मध्ये सुवर्ण पदक मिळालं आहे.

Updated: Aug 30, 2018, 08:03 PM IST
आशियाई स्पर्धा २०१८: भारताच्या जॉनसनला सुवर्ण पदक

जकार्ता : भारताचा धावपटू जिनसन जॉनसनला १८व्या आशियाई स्पर्धा २०१८मध्ये सुवर्ण पदक मिळालं आहे. जॉनसन पुरुषांच्या १५०० मीटर स्पर्धेत पहिला आला. जॉनसननं ३ मिनीट ४४.७२ सेकंदांमध्ये शर्यत पूर्ण केली. इराणच्या अमीर मुरादीनं ३ मिनीट ४५.६२१ सेकंदांमध्ये शर्यत पूर्ण करून रौप्य आणि बहरीनच्या मोहम्मद तौलाईनं ३ मिनीट ४५.८८ सेकंदांमध्ये शर्यत पूर्ण करून कांस्य पदक जिंकलं.

८०० मीटरमध्ये भारताला सुवर्ण पदक जिंकवून देणारा मनजीत सिंग चहल यानं ३ मिनीट ४६.५७ सेकंदांमध्ये शर्यत पूर्ण केली. तो चौथ्या क्रमांकावर आला. जिनसन जॉनसनला ८०० मीटर शर्यतीमध्ये रौप्य पदक मिळवलं होतं. भारताला या आशियाई स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत १२ सुवर्ण पदकांसह ५७ पदकं मिळाली आहेत. पदकं मिळवणाऱ्यांच्या यादीमध्ये भारत ८व्या क्रमांकावर आहे. भारताच्या नावावर १२ सुवर्ण, २० रौप्य आणि २५ कांस्य पदकं आहेत.