या सुपरस्टार अभिनेत्याचं एका दुखापतीमुळे क्रिकेटर होण्याचं स्वप्न अपूर्ण

स्टार बॅटमिंटनपटूचा नवरा आधी क्रिकेट खेळायचा पण या कारणामुळे सोडावं लागलं मैदान

Updated: Jul 17, 2021, 08:12 PM IST
या सुपरस्टार अभिनेत्याचं एका दुखापतीमुळे क्रिकेटर होण्याचं स्वप्न अपूर्ण

मुंबई: इंडस्ट्रिमध्ये अभिनेता म्हणून नाव कमवणाऱ्या अभिनेत्याचं क्रिकेटर होण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं. त्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याचं क्रिकेटर व्हायचं स्वप्न अपूर्ण राहिलं आहे. विष्णू विशाल साऊथच्या सिनेसृष्टीत आपल्या अभिनयामुळे खूप प्रसिद्ध आहे. तो आज आपला 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. अनेकांना हे माहीत नसेल की विष्णूचं पहिलं प्रेम सिनेसृष्टी नाही तर क्रिकेट होतं. 

एका अपघातामुळे त्याला क्रिकेटच्या विश्वास येता आलं नाही तो अभिनयाकडे वळला. त्याला फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपला ठसा उमटवण्यासाठी अनेक संकटांचा सामना करावा लागला होता. अलीकडेच 22 एप्रिल रोजी त्याने बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाशी लग्न केलं. 

तमिळ फिल्ममध्ये येण्याआधी विष्णू विशाल एक क्रिकेटर होता. तमिळनाडूकडून तो क्रिकेट खेळायचा. वेगवेगळ्या लीगमध्ये भाग घ्यायचा काही सेलिब्रिटी क्रिकेट लीगमध्ये देखील त्याने भाग घेतला होता. मीडिया रिपोर्टनुसार विष्णूला खेळताना गंभीर दुखापत झाली. त्यानंतर तो क्रिकेटपासून दूर राहिला. या दुखापतीमुळे त्याला बराच काळ मैदानापासून लांब राहावं लागलं होतं. त्यामुळे पुन्हा क्रिकेटच्या मैदानात उतरणंही खूप कठीण झालं होतं. 

दुखापतीमुळे आपल्याला क्रिकेट सोडावं लागलं ही खंत कायम विष्णूच्या मनात राहिली आहे. काही काळापूर्वी ट्वीट करून त्याने आपलं हे दु:ख सांगितलं होतं. एका ट्वीटला उत्तर देताना विष्णू म्हणाला होता की मला खेळणं सुरू ठेवायला हवं होतं. जेव्हा टी 20 आलं होतं त्यावेळीच मी क्रिकेट खेळणं सोडलं. हे दु:ख कायम आहे.