Kagiso Rabada: रबाडाच्या इशाऱ्यावर नाचलं मेलबर्न; प्रेक्षकांनी अचूक साधला 'टायमिंग', पाहा Video

AUS vs SA,kagiso rabada video : बॉक्सिंग डे सामन्याच एक मनोरंजक दृष्य पहायला मिळालं. सामना सुरू असताना रबाडा बॉन्ड्री लाईनजवळ (Kagiso Rabada Mimic) उभा होता.

Updated: Dec 27, 2022, 05:36 PM IST
Kagiso Rabada: रबाडाच्या इशाऱ्यावर नाचलं मेलबर्न; प्रेक्षकांनी अचूक साधला 'टायमिंग', पाहा Video title=
kagiso rabada video

Australia vs South Africa, 2nd Test: सध्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण (AUS vs SA) आफ्रिकामध्ये कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना म्हणजेच बॉक्सिंग डे टेस्ट (Boxing Day Test) सामन्यातील दुसऱ्या दिवशी डविड वॉर्नरने (David Warner) धमाकेदार डबल सेंच्यूरी मारली. 16 फोर आणि दोन सिक्स मदतीने वॉर्नरने (David Warner) ऑस्ट्रेलियन क्रिकेट चाहत्यांना ख्रिसमसचं गिफ्ट दिलंय. सध्या सामन्यात ऑस्ट्रेलिया फंटफूटवर दिसत आहे. अशातच या सामन्यातील मजेशीर व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय. (kagiso rabada stretching exercises fans mimic at mcg vs aus vs sa boxing day test watch video marathi news)

पहिला दिवशी साऊथ अफ्रिकन (South Africa) खेळाडूंची तारंबळ उडाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने (Australia) सावध सुरूवात केली. उसमान ख्वाजा लवकर बाद झाल्याने मैदानात आलेल्या लाबुशेनेला देखील जास्त वेळ मैदानात टिकता आलं नाही. त्यानंतर स्मिथने (Steven Smith) वॉर्नरला मोलाची साथ दिली. वॉर्नरने एक बाजू लावून धरल्याने ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारला आली आहे. साऊथ अफ्रिकेचा स्टाईक गोलंदाज कबिसो रबाडाने (Kagiso Rabada) उस्मान ख्वाजाला तंबूत पाठवलं आणि साऊथ अफ्रिकेला चांगली सुरूवात करून दिली.

आणखी वाचा - David Warner Double Century : डेविड वॉर्नरने रचला इतिहास! मेलबर्न कसोटीत ठोकलं खणखणीत द्विशतक

बॉक्सिंग डे सामन्याच एक मनोरंजक दृष्य पहायला मिळालं. सामना सुरू असताना रबाडा बॉन्ड्री लाईनजवळ (Kagiso Rabada Mimic) उभा होता. त्यावेळी तो नेहमीप्रमाणे हातवारे करत वॉमअप करत असताना प्रेक्षकांनी त्यांची गम्मत केली. त्याला पाहून मागे उभे असलेल्या प्रेक्षकांनी त्याची नक्कल केली. 

पाहा Video - 

दरम्यान, रबाडाने (Kagiso Rabada) डावा हात उचलत स्लोमोशनमध्ये झुलू लागला. त्याला पाहून प्रेक्षकांनी देखील त्याची कॉपी केली. प्रेक्षकांचं हे कृत्य पाहून अनेकांना हसू आवरलं नाही. रबाडानंतर आता सोशल मीडियावर माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर मर्व्ह ह्युजेसचे (Merv Hughes) फोटो व्हायरल होताना दिसत आहे. त्याची देखील प्रेक्षकांनी नक्कल केली होती. त्यामुळे आता बॉक्सिंग डे टेस्ट (Boxing Day Test) काही अर्थाने खास ठरत असल्याचं पहायला मिळतंय.