नवी दिल्ली : निडास ट्रॉफीच्या फायनलमध्ये विजयी खेळी करणारा दिनेश कार्तिकने भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनावर अधिराज्य केले आहे. दिनेश कार्तिकने या सामन्यात शेवटच्या चेंडूवर षटकार लगावरून भारताला पराभूत होणारा सामना जिंकून दिला.
आता या विजयाच्या जल्लोषातून दिनेश कार्तिक बाहेर पडून आयपीएलच्या सीझन ११ च्या तयारीला लागला आहे. गौतम गंभीरनंतर कोलकता नाइट राइडरची धुरा आता दिनेश कार्तिककडे सोपविण्यात आली आहे. इतकी मोठी जबाबदारी अंगावर पडल्यावरही त्याच्या मनात एक इच्छा होती ती अपूर्ण राहिली आहे. कार्तिकने सांगितले की आयपीएलमध्ये त्याला चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळण्याची कार्तिकची इच्छा होती. चेन्नई दिनेश कार्तिकचा होम फ्रेंचाइजी आहे.
द हिंदू शी बोलताना तो म्हणाला, आयपीएलच्या पहिल्या सिझनपासून मला वाटत होते की मला चेन्नईकडून खेळायला मिळायला हवे. पण १० वर्षात एकदाही असे झाले नाही. चेन्नईसाठी खेळण्याचे माझे स्वप्न होते पण ते आता कमी कमी होत गेले. मला माहिती नाही मी चेन्नईकडून खेळू शकेल की नाही. माझा जन्म या ठिकाणी झाला, त्यामुळे मला चेन्नईकडून खेळणे आवडले असते.
गौतम गंभीरच्या गैरहजेरीत आता दिनेश कार्तिकच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
कार्तिक म्हटला, आयपीएलमध्ये कोलकता टीमकडून खेळणार आहे. ही माझ्यासाठी खूप सन्मानाची गोष्ट आहे. मी संपूर्ण प्रयत्न करेल की मी माझी जबाबदारी पूर्ण करू शकेल. मला वाटते की चेन्नई, बंगळुरू आणि कोलकता आणि मुंबईचे क्रिकेट फॅन्स आपल्या टीमसाठी खूप लॉयल आहेत. ही आयपीएलची सुंदरता आहे.