BPL 2023 : सामन्यादरम्यान संघाचे मुख्य प्रशिक्षक 'ते' कृत्य करताना कॅमेऱ्यात कैद, सोशल मीडियावर Photo Viral

Khaled Mahmud : बांगलादेश प्रीमियर लीगमधील एका सामन्यादरम्यान प्रशिक्षकाचं ते कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं. त्यानंतर तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

Updated: Feb 12, 2023, 12:42 PM IST
BPL 2023 : सामन्यादरम्यान संघाचे मुख्य प्रशिक्षक 'ते' कृत्य करताना कॅमेऱ्यात कैद, सोशल मीडियावर Photo Viral  title=
Khaled Mahmud Spotted on Camera Smoking During Khulna Tigers BPL 2023 Match Against Fortune Barishal Photo Viral on Social media

Khaled Mahmud Viral Photo : हा सोशल मीडियाचा जमाना आहे. इथे कधी काय व्हायरल होईल याचा नेम...सगळीकडे आजकाल कॅमेऱ्याची तीक्ष्ण नजर असते. तुमचं एक चुकीचं कृत्य लगेचच या कॅमेऱ्यात कैद होतं. क्रिकेटच्या मैदानातील अनेक व्हिडीओ आजकाल व्हायरल होतं असतात. त्यात काही मजेदार असतात, तर काही धक्कादायक असतात. असाच एक सामन्यादरम्यान मुख्य प्रशिक्षकाचं कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं आणि ते आता सोशल  मीडियावर व्हायरल होतं आहे. प्रशिक्षकाचं हे कृत्य पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. (Khaled Mahmud Spotted on Camera Smoking During Khulna Tigers BPL 2023 Match Against Fortune Barishal  Photo Viral on Social media)

हे मान्य नाही! 

गुरुवारी म्हणजे 10 फेब्रुवारीला बांगलादेश प्रीमियर लीग सामन्यातील त्या प्रशिक्षकाचं कृत्याने जगाचं लक्ष वेधलं आहे. लीगच्या शेवटच्या सामन्यादरम्यान खुलना टायगर्सचे मुख्य प्रशिक्षक खालेद महमूद रूममध्ये सिगारेट ओढताना दिसले. त्यांचं हे कृत्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. 

खालिद महमूद हे बांगलादेशचे माजी क्रिकेटपटूही राहिले आहेत. दरम्यान बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये खुलना टायगर्स आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. अशा परिस्थितीत शेवटच्या साखळी सामन्यात सांत्वनात्मक विजय नोंदवून स्पर्धेला निरोप दिला. 

बीपीएलच्या शेवटच्या साखळी सामन्यात फॉर्च्युन बरीशाल संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 गडी गमावून 169 धावा केल्या. प्रत्युत्तरात खुलना टायगर्स 19.2 षटकांत 4 विकेट गमावून 166 धावा करून विजयाच्या जवळ उभ्या असताना खालिद महमूद हे सिगारेट ओढताना दिसले. पुढच्याच चेंडूवर खुलना टायगर्सच्या फलंदाजाने षटकार ठोकला आणि तीन चेंडू शिल्लक असताना संघाने सामना जिंकला. या विजयासह खुलना टायगर्सचा बीपीएलमधील प्रवासही संपला.