मुंबई : कोलकाता विरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबईला 52 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. मॅचमध्ये एक अजब प्रसंग घडला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच खूप चर्चाही झाली आणि लोकांना हसूही आवरलं नाही.
बॉलिंग करताना मुंबईचा किरोन पोलार्डने मैदानात असं काही केलं की ज्यामुळे त्याला अंपायरची माफी मागावी लागली. इतकच नाही तर त्याच्या कृतीमुळे रोहित शर्माला मॅचमध्ये हसू आवरेनासं झालं.
कोलकाताच्या 10 व्या ओव्हरमध्ये मुंबईच्या ऑलराउंडर किरोन पोलार्डने बॉलिंग केली. यावेळी 5 वा बॉल टाकताना हातून निसटला आणि अंपायरच्या पोटावर लागला.
या घटनेनंतर किरोन पोलार्डने अंपायरची माफी मागितली. त्याचवेळी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मालाही आपले हसू आवरता आले नाही.
— Patidarfan (@patidarfan) May 9, 2022
या मजेशीर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सला विजयासाठी 166 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सचा संघ 113 धावांत गारद झाला.