Mumbai Indians: नुकतंच इंडियन प्रिमीयर लीग ( IPL 2023 ) संपली असून आता मेजर लीग क्रिकेटच्या ( Major League Cricket ) तयारीला सुरुवात झाली आहे. अमेरिकेतील लोकांमध्ये क्रिकेट लोकप्रिय देश बनावा यासाठी ही लीग खेळवण्यात येणार आहे. जवळपास 4 वर्षांच्या तयारीनंतर या लीगचं पहिलं एडिशन खेळवलं जातंय. यामध्ये मुंबई इंडियन्सची ( Mumbai Indians ) फ्रेंचायझी एमआय न्यूयॉर्कने ( MI New York ) त्यांचा कोचिंग स्टाफ आणि खेळाडूंची घोषणा केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 6 टीम्समध्ये 13 जुलैपासून ही लीग खेळवली जाणार आहे. या लीगमध्ये मोठ्या आणि दिग्गज टीमचा समावेश आहे. त्याचप्रमाणे नामांकित फ्रेंचायझींच्या टीमचाही समावेश आहे.
मुंबई इंडियन्सने ( Mumbai Indians ) त्यांची न्यूयॉर्क फ्रेंचायझीसाठी ज्या खेळाडूंची लिस्ट जाहीर करण्यात आलीये, त्यामध्ये दिग्गज खेळाडूंची नावं असल्याचं समोर आलंय. यामध्ये राशिद खान, ट्रेंट बोल्ट आणि कागिसो रबाडा या उत्तम गोलंदाजांचा समावेश आहे. याशिवाय निकोलस पूरन, टिम डेव्हिड, डेवाल्ड ब्रेविस, जेसन बेहरेनडॉर्फ यांनाही टीममध्ये सामील केलंय. किरॉन पोलार्ड आणि डेव्हिड व्हिएजा यांनाही टीममध्ये संधी देण्यात आलीये.
एमआय न्यूयॉर्क टीमच्या कर्णधारपदाची धुरा किरण पोलॉर्डकडे सोपवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अमेरिकेचा कर्णधार मोनक पटेल, माजी कर्णधार स्टीव्हन टेलर, नॅथस केन्झिग, शाहयान जहांगीर आणि काईल फिलिप यांचा समावेश करण्यात आलाय.
मुंबई इंडियन्सने त्यांच्या मेजर लीग क्रिकेट फ्रँचायझी MI न्यूयॉर्कच्या (MI New York ) गोलंदाजी कोचची घोषणा केलीये. श्रीलंकेचा महान गोलंदाज लसिथ मलिंगा यांची गोलंदाजीच्या कोचपदी नियुक्ती केलीये. नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये लसिथ मलिंगाने राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजी विभागाच्या कोच पदाची धुरा स्विकारली होती.
मेजर लीग क्रिकेटचा ( Major League Cricket ) पहिला सिझन 13 जुलै पासून सुरु होणार असून या लीगची फायनल 30 जुलै रोजी खेळवली जाणार आहे. या लीगमध्ये एकूण 6 टीम्स असून ज्यामध्ये मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या तीन टीम्सचा समावेश आहे. MI ची MI न्यूयॉर्क, KKR ची लॉस एंजेलिस नाईट रायडर्स आणि CSK ची टेक्सास सुपर किंग्स या टीम्स मेजर क्रिकेट लीगमध्ये उतरणार आहेत. चाहत्यांना या लीगची फार उत्सुकता लागली आहे.