KL Rahul injured while batting practice : बांगलादेशाविरूद्धच्या (IND vs BAN) दुसऱ्या वनडे सामन्यातमध्ये टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) दुखापत झाली होती. यानंतर तो वनडे सिरीज आणि बांगलादेशविरूद्धच्या दोन्ही टेस्टमधून बाहेर पडला. असं असताना टीम इंडियाला अजून एक मोठा धक्का बसला आहे. टीमचं नेतृत्व करणारा केएल राहुल (KL Rahul) देखील दुखापतग्रस्त झाल्याची माहिती आहे. त्यामुळे उद्यापासून होणाऱ्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात केएल राहुल खेळणार की नाही यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. (KL Rahul injured while batting practice)
बांगलादेशविरूद्ध खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या आणि शेवटच्या टेस्ट सामन्यात टीम इंडिया केएल राहुलविना मैदाना उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे केएल राहुलच्या रूपाने टीम इंडियाला एक मोठा धक्का बसला आहे. एका वेबसाईनटने दिलेल्या रिपोर्टनुसार, नेट प्रॅक्टिस करत असताना केएल राहुलला दुखापत झाली आहे. त्याच्या हाताला दुखापत झाल्यामुळे तो उद्याच्या सामन्यात खेळणार की नाही, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
टीम इंडियाच्या फलंदाजीचे कोच विक्रम रोठोड यांनी केएल राहुलच्या दुखापतीबाबत माहिती दिली आहे. मात्र त्यांनी राहुल उद्याच्या सामन्यात खेळणार की नाही याबाबत काहीच सांगितलं नाही.
विक्रम प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये बोलताना म्हणाले की, केएल राहुलला झालेली दुखापत जास्त गंभीर नाहीये. आशा आहे की, तो दुसऱ्या सामन्यापूर्वी ठीक होईल. डॉक्टरांकडून त्याची तपासणी सुरु आहे.
रोहित शर्मा सामन्यात उपलब्ध नसल्याने केएल राहुलला कर्णधारपद देण्यात आलं होतं. मात्र आता केएल राहुलच्या अनुपस्थितीत टीमचं नेतृत्व कोणाकडे जाणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. अशा परिस्थितीत सध्याच्या टीम इंडियाचा उपकर्धणार चेतेश्वर पुजाराकडे टीमची धुरा सोपवली जाऊ शकते.
टीम इंडिया सध्या बांगलादेशविरूद्ध (India vs Bangladesh) दोन सामन्यांची कसोटी सिरीज खेळतेय. यामध्ये टीम इंडियाने पहिला सामना जिंकून कसोटीत1-0 ने आघाडी घेतलीय. त्यात आता दुसरा कसोटी सामना 22 डिसेंबरला सुरू होणार आहे. यापूर्वीच टीम इंडियाचे (team india) दोन खेळाडू शेवटच्या कसोटी सामन्यातून बाहेर झाले आहे. त्यामुळे टीम इंडियाला मोठा धक्का आहे.
येत्या 22 डिसेंबरला बांगलादेशविरूद्ध दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि बॉलर नवदीप सैनी (Navdeep Saini) शेवटच्या कसोटी सामन्यातून बाहेर झाले आहे. या दोन्ही खेळाडूंना झालेल्या दुखापतीमुळे त्यांना कसोटी सामन्यातून वगळण्यात आले आहे.