विराट कोहलीवर फिदा आहे ही महिला क्रिकेटर, बंगळूरु संघाला सुनावले खडे बोल

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचे जगभरात अनेक चाहते आहेत. खासकरुन मुली विराटच्या अधिक फॅन आहेत. 

Updated: May 8, 2018, 10:48 AM IST
विराट कोहलीवर फिदा आहे ही महिला क्रिकेटर, बंगळूरु संघाला सुनावले खडे बोल title=

मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचे जगभरात अनेक चाहते आहेत. खासकरुन मुली विराटच्या अधिक फॅन आहेत. केवळ भारतातील मुलीच नव्हे तर परदेशातीलही विराटचा फिमेल फॅन्स आहेत. इंग्लंड संघातील अनेक महिला क्रिकेटर विराट कोहलीच्या चाहत्या आहेत. या इंग्लिश महिला क्रिकेटर्स तर विराटसाठी वेड्या झाल्यात. एकीने तर विराट कोहलीला सोशल मीडियावर आय लव्ह यू असं म्हटलंय तर एकीने तर त्याला लग्नासाठी प्रपोजही केले होते. इंग्लंड संघातील विकेटकीपर-फलंदाज सारा टेलर, वेगवान गोलंदाज केट क्रॉस, फलंदाज डॅनियल वॅट, वेगवान गोलंदाज ब्रँट या सगळ्या विराटच्या मोठ्या फॅन आहेत. 

आता महिला क्रिकेट संघातील आणखी एक क्रिकेटर्सने विराटवर फिदा झालीये. हिचे नाव आहे अॅलेक्झँड्रा हर्टली. ही महिला संघातील ऑलराऊंडर क्रिकेटर आहे. अॅलेंक्झँड्राने आयपीएल २०१८मध्ये विराटची स्तुती करताना दुसरीकडे मात्र बंगळूरु संघाला खडे बोल सुनावलेत. कोलकाताविरुद्धच्या सामन्यात जेव्हा बंगळूरुला पराभवाचा सामना करावा लागला त्यानंतर अॅलेंक्झँड्राने बंगळूरु संघावर टीका केली. तिने ट्विटरवरुन संघावर नाराजी व्यक्त केली.