त्याची कॅन्सरशी झुंज सुरुच! माजी कर्णधाराचं 49 व्या वर्षी निधन झाल्याचं वृत्त खोटं

Legendary Cricketer Battling Cancer Died: भारतीय फिरकीपटू आर, अश्विननेही ट्वीटरवरुन अगदी मोजक्या शब्दांमध्ये या क्रिकेटपटूच्या मृत्यूसंदर्भात आपल्या भावना व्यक्त केला आहेत. घडलेला प्रकार हा फारच दु:खद आहे असं अश्विनने ट्वीटरवरुन म्हटलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 23, 2023, 01:43 PM IST
त्याची कॅन्सरशी झुंज सुरुच! माजी कर्णधाराचं 49 व्या वर्षी निधन झाल्याचं वृत्त खोटं title=
आर. अश्विननेही सोशल मीडियावरुन वाहिली श्रद्धांजली

Legendary Cricketer Battling Cancer Died:  झिम्बाब्वेचा माजी क्रिकेटपटू हीथ स्ट्रीकचं निधन झालं आहे. कर्करोगाशी दीर्घकाळ लढा दिल्यानंतर वयाच्या 49 व्या वर्षी हीथचं निधन झाले. हीथ स्ट्रीकवर दक्षिण आफ्रिकेत उपचार सुरू होते. आफ्रिकेमधील चाचणीदरम्यान हीथला कॅन्सर असल्याचं समजल्यापासून त्याच्यावर उपचार सुरु होते. त्याचे जवळचे मित्र आणि जवळचे लोकांनी त्याला यकृताचा कर्करोग होता अशी माहिती दिली होती. आर, अश्निन, विरेंद्र सेहवागसारख्या अनेक खेळाडूंनी श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर हीथनेच आपण जिवंत असल्याची माहिती निधनाची बातमी देणाऱ्या खेळाडूच्या माध्यमातून दिली आणि हा सारा प्रकार अफवा असल्याचं स्पष्ट झालं.

अनेकांनी व्यक्त केला शोक

झिम्बाब्वेचा माजी वेगवान गोलंदाज आणि स्ट्रीकबरोबर अनेक वर्ष क्रिकेट खेळलेल्या हेन्री ओलोंगाने तसेच सध्याचा झिम्बाब्वेचा कर्णधार सीन विल्यम्स यांनी सोशल मीडियावरुन शोक व्यक्त केला आहे. मात्र हीथ स्ट्रीकचं निधन झाल्यासंदर्भात त्याच्या कुटुंबाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. 

दुसऱ्या बाजूला भेटूयात

ओलोंगाने क्रिकेटमधील संदर्भ वापरत अनोख्या पद्धतीने हिथला श्रद्धांजली अर्पण केली. "हीथ स्ट्रीक दुसऱ्या बाजूला गेल्याची दु:खद बातमी समोर येत आहे. झिम्बाब्वे क्रिकेटमधील या महान खेळाडूलच्या आत्म्याला शांती लाखो. तो झिम्बाब्वे क्रिकेटने घडवलेल्या सर्वकालीन सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू होता. तुझ्यासोबत खेळणे फारच समाधानकारक आणि आनंद देमारं होतं. माझ्या गोलंदाजीचा स्पेल संपल्यावर (आयुष्य संपल्यावर) आपण दुसर्‍या बाजूला भेटू," असं ओलोंगाने ट्वीटरवरुन म्हटलं.

विद्यमान कर्णधारही हळहळला

"स्ट्रीकी. तू आणि तुझ्या कुटुंबाने माझ्यासाठी आणि इतर अनेकांसाठी काय केले आहे हे शब्दांमध्ये सांगता येणार नाही. या बातमीने आज आमचं हृदय तुटलं आहे. तू एक सुंदर कुटुंब आणि आमच्यासाठी जगण्याचा वारसा मागे सोडून गेला आहेस! तुझी आठवण येईल, आम्ही तुमच्यावर मनापासून प्रेम करतो. तुझ्या आत्म्याला शांती मिळो," असं झिम्बाव्वेचा कर्णधार सीन विल्यम्सने ट्वीटरवरुन म्हटलं.

अश्विनने वाहिली श्रद्धांजली

भारताचा फिरकीपटू आर. अश्विननेही ट्वीटरवरुन श्रद्धांजली अर्पण केली आहे. "हीथ स्ट्रीकचं निधन झालं. हे फार दुख:द आहे," असं अश्विनने म्हटलं.

सेहवागही हळहळला...

"हीथ स्ट्रीकच्या निधनाचं वृत्त ऐकून फार वाईठ वाटलं. तो फार उत्तम स्पर्धक होता. तो झिम्बाब्वेचा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू होता. मी ज्यांच्याविरोधात खेळलो त्यापैकी काहीजण आज आपल्यात नाही हे फार दु:खद आहे, असं विरेंद्र सेहवागने ट्वीटरवरुन हीथ स्ट्रीकबरोबरचा फोटो पोस्ट करत म्हटलं.
 

कामगिरी पाहून व्हाल थक्क

झिम्बाब्वेच्या या माजी कर्णधाराने 65 कसोटी आणि 189 एकदिवसीय सामन्यांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केलं. आजच्या घडीलाही हीथ स्ट्रीक कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये झिम्बाब्वेसाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. त्याच्या नावावर कसोटीमध्ये 216 आणि एकदिवसीय सामन्यात 239 विकेट्स आहेत. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये 100 बळी घेणारा स्ट्रीक हा झिम्बाब्वेचा पहिला क्रिकेटपटू ठरला. 100 कसोटी बळी आणि 1000 कसोटी धावांची दुहेरी कामगिरी करणारा तो झिम्बाब्वेचा एकमेव  क्रिकेटपटू आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये 2000 धावा आणि 200 बळी घेणाराही तो झिम्बाब्वेचा एकमेव खेळाडू आहे.

कर्णधार झाला अन् इतिहास रचला

हीथ स्ट्रीकने कसोटीमध्ये एकूण 1990 धावा केल्या असून 127 वर नाबाद हा त्याचा सर्वोत्तम स्कोअर आहे. वनडेत 28.29 च्या सरासरीने त्याने 2943 धावा केल्या आहेत. स्ट्रीकने 1993 मध्ये कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्यानंतर 2000 मध्ये संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली. हीथ स्ट्रीकच्या नेतृत्वाखालीच 2001 मध्ये न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका झिम्बाब्वेने 2-1 अशा फरकाने जिंकली. झिम्बाब्वेने पहिल्यांदाच परदेशात कसोटी मालिका जिंकून इतिहास रचला.