close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

माही मार रहा है! पाहा लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंह धोनीचा नवा अंदाज

 महेंद्रसिंह धोनीने त्याच्या कारकिर्दीत प्रशंसनीय उंची गाठली. 

Updated: Aug 18, 2019, 12:50 PM IST
माही मार रहा है! पाहा लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंह धोनीचा नवा अंदाज
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : भारतीय क्रिकेट संघात आपल्या दमदार खेळाच्या बळावर आणि कर्णधार पदाला साजेशा कामगिरीच्या बळार महेंद्रसिंह धोनीने त्याच्या कारकिर्दीत प्रशंसनीय उंची गाठली. गेल्या काही दिवसांपासून माही चर्चेत आहे तो म्हणजे त्याच्या आणखी एका उल्लेखनीय निर्णयामुळे. हा निर्णय आहे, सैन्यदलासोबतच्या सेवेचा. 

क्रिकेटमधून काही काळाची उसंत घेत माहीने त्याला प्रदान करण्यात आलेल्या (मानद) लेफ्टनंट कर्नल या पदाचा मान राखत सैन्यदलाच्या सेवेत आपलं योगदान दिलं. जम्मू- काश्मीरमधील पोस्टवर धोनीने एका सैनिकाचं आयुष्य जगत त्यांच्याप्रमाणेच देशसेवेत हातभार लावला. यादरम्यान सोशल मीडियावर त्याचे बरेच फोटोही व्हायरल होत होते. 

सध्याच्या घडीला माहीचा आणखी एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये तो बास्केटबॉल कोर्टमध्ये काही मुलांसह क्रिकेट खेळताना दिसत आहे. चेन्नई सुपर किंग्स या माहीच्या आयपीएल संघाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुनही या क्षणाचा फोटो पोस्ट करण्यात आला. ज्यामध्ये कॅप्शनमध्ये धोनीचा उल्लेख 'थाला' म्हणूनही करण्यात आला. 

सध्याच्या घडीला सैन्यदलाची सेवा संपरून धोनी पुन्हा एकदा त्याच्या दैनंदिन आयुष्यात परतला आहे. तेव्हा आता खुद्द माही त्याच्या या अनुभवाविषयी नेमकं कोणत्या शब्दांत कथन करतो हे जाणून घेण्यासाठीसुद्धा त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता असणार यात शंका नाही.