Lionel Messi ला दिलेल्या 'बिश्त' गाऊनला मागणी, इतक्या कोटींची दिली ऑफर

Lionel Messi Bisht: फीफा वर्ल्डकप 2022  स्पर्धेच्या जेतेपदावर अर्जेंटिनाने नाव कोरलं. या विजयाला आता आठवडा उलटून गेला आहे. असं असलं तरीही अर्जेंटिना आणि मेस्सीभोवतीचं बातम्यांचं वलय संपता संपत नाही. वर्ल्डकप सुपूर्द करताना अर्जेंटिनाचा कर्णधार लियोनेल मेस्सीला अरेबिक काळा गाऊन म्हणजेच बिश्त घातला होता. आता या गाऊनची जोरदार चर्चा आहे. 

Updated: Dec 25, 2022, 04:37 PM IST
Lionel Messi ला दिलेल्या 'बिश्त' गाऊनला मागणी, इतक्या कोटींची दिली ऑफर title=

Lionel Messi Bisht: फीफा वर्ल्डकप 2022  स्पर्धेच्या जेतेपदावर अर्जेंटिनाने नाव कोरलं. या विजयाला आता आठवडा उलटून गेला आहे. असं असलं तरीही अर्जेंटिना आणि मेस्सीभोवतीचं बातम्यांचं वलय संपता संपत नाही. वर्ल्डकप सुपूर्द करताना अर्जेंटिनाचा कर्णधार लियोनेल मेस्सीला अरेबिक काळा गाऊन म्हणजेच बिश्त घातला होता. आता या गाऊनची जोरदार चर्चा आहे. कतारचे इमिर तमिम बिन हमद अल थानी यांनी मेस्सीला हा बिश्त सन्मान म्हणून घातला होता. आता या बिश्तची किंमत कोट्यवधींच्या घरात गेली आहे. ओमानी वकील आणि खासदार अहमद अल बारवानी यांनी या बिश्तसाठी 1 मिलियन डॉलर्सची (8.2 कोटी रुपये) बोली लावली आहे. यासाठी बारवानी यांनी ट्विटरवर एक पोस्ट लिहिली आहे. त्यांनी लिहिलं आहे की, "ओमानच्या सल्तनतकडून, कतार 2022 विश्वचषक जिंकल्याबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो. अरबी बिश्त हे शौर्याचे प्रतीक आहे. त्या बिश्तच्या बदल्यात मी तुम्हाला एक मिलियन डॉलर्स ऑफर करत आहे."

बारवानी यांनी द नॅशनलशी बोलताना सांगितले की "खेळाडूला वाटाघाटी करायची असल्यास अधिक पैसे देण्यास तयार आहे.कतारच्या अमीराने मेस्सीला बिश्त दिला तेव्हा मी स्टेडियममध्ये तो क्षण थेट पाहत होतो." अल बारवानी यांनी पुढे सांगितलं की, वर्ल्डकप हा अरब राष्ट्रांसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि बिश्त हे शौर्य, सचोटी, औदार्य आणि प्रामाणिकपणाचे प्रतीक आहे.अरब देशांमध्ये बिश्त हा लोकप्रिय आणि पारंपारित पुरुषांचा पोशाख आहे. बिश्त उंटाचे केस आणि बकरीच्या लोकरपासून बनलेला आहे. अरब राष्ट्रांमध्ये मान्यवर, लग्न, सण, पदवी आणि ईद यांसारख्या विशेष प्रसंगी परिधान केले जाते.

बातमी वाचा- FIFA World Cup 2022 स्पर्धा जिंकल्यानंतर अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी नेट कापली, कारण...

मेस्सीच्या शानदार खेळाच्या जोरावर अर्जेंटिनाने फिफा विश्वचषक 2022 चे विजेतेपद पटकावलं. अर्जेंटिनाने अंतिम फेरीत फ्रान्सचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 असा पराभव केला. अंतिम सामना जिंकल्यानंतर मेस्सीने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान करून ट्रॉफी उचलली. या काळ्या रंगाच्या ड्रेसची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. अर्जेंटिनाने तिसऱ्यांदा फिफा विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. अर्जेंटिनाने याआधी 1978 आणि 1986 मध्ये ही ट्रॉफी जिंकली होती. अर्जेंटिनाला तिसऱ्यांदा हे विजेतेपद मिळवण्यासाठी 36 वर्षे वाट पाहावी लागली.