मुंबई : टीम इंडियाचे (Team India) माजी कर्णधार लिटील मास्टर सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मायकल हसीला (Michael Hussey) सडेतोड उत्तर दिलं आहे. हसीने भारतातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गावरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. भारतात टी 20 वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्ल्ड कपसाठी भारतात येणं सुरक्षित नसल्याचं विधान हसीने केलं होतं. तसेच अनेक क्रिकेट बोर्डही वर्ल्ड कपसाठी भारतात येण्यासाठी विचार करतील, असंही हसीने म्हटलं होतं. यावरुन गावस्कर हसीवर संतापले आहेत. (little master sunil gavskar slam to Michael Hussey on t 20 world cup 2021)
गावस्कर काय म्हणाले?
"ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना आयपीएलच्या माध्यामातून मोठ्या प्रमाणात मजबूत पैसे मिळतात. कोरोना असताना आयपीएलच्या 14 व्या मोसमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळेस ऑस्ट्रेलियन खेळाडूंना असुरक्षित वाटलं नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असताना आयपीएल रद्द व्हायला हवा, असं कोणताही ऑस्ट्रेलियन खेळाडू म्हणाला नाही. एवढचं नाही, मेलबर्नमध्ये कोरोना असताना ऑस्ट्रेलिया ओपनचं आयोजन करण्यात आलं. त्यावेळेस कोरोनामुळे धोका निर्माण होईल, ही भावना कुठे गेली होती", असा संतप्त सवाल लिटील मास्टरांनी उपस्थित केला.
"ऑस्ट्रेलिया आतापासूनच अशाप्रकारे विधान का करतेय?, आयपीएलचा 14 वा मोसम स्थगित होण्याआधी माईक हसीची स्थिती काय होती, हे सर्वांना माहिती आहे. भारताने कोरोनाच्या पहिल्या लाटेचं सक्षमरित्या सामना केला. टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला अजून 4 महिने आहेत. त्यामुळे बीसीसीआयकडे आयसीसीच्या या स्पर्धेच्या आयोजनासाठी पर्याप्त वेळ आहे. त्यामुळे आतापासूनच असं उलट सुलट वक्तव्य करणं योग्य ठरणार नाही", असं गावस्करांनी ठणकावून सांगितलं.
हसीने काय म्हटलं होतं?
"भारतात टी 20 स्पर्धेत खेळणं अवघड असेल. आपण आयपीएलमधील 8 संघांचंच उदाहरण घेऊयात. या वर्ल्ड कप स्पर्धेत 8 किंवा त्यापेक्षा अधिक टीम सहभागी होतील. हे संघ विविध शहरात खेळले तर त्यांना कोरोना होण्याची शक्यता अधिक असेल", असं हसी म्हणाला होता.
हसीबद्दल थोडक्यात
हसी हा आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्सचा बॅटिंग कोच आहे. हसीला महिन्यापूर्वी भारतात आयपीएलच्या 14 व्या मोसमादरम्यान कोरोनाची लागण झाली होती. याआधी हसीने चेन्नईकडून 59 सामन्यात प्रतिनिधित्व केलं होतं. तसेच हसीने 79 कसोटी, 185 एकदिवसीय आणि 38 टी 20 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केलं आहे.
संबंधित बातम्या :
सर्वात धोकादायक बॉलर कोण? विराट कोहली म्हणतो....
इंग्लंड दौऱ्याने आतापर्यंत 'या' भारतीय खेळाडूंची कसोटी कारकिर्द संपवली