WI vs IND 1st Test : भारत विरूद्ध वेस्ट इंडिज ( WI vs IND ) यांच्यात सध्या पहिली टेस्ट मॅच खेळवली जातेय. यावेळी विंडसर पार्क डोमिनिकामध्ये खेळवण्यात येणाऱ्या या सामन्यात टीम इंडियाचं ( Team India ) वर्चस्व दिसून येतंय. या सामन्याद्वारे डेब्यू करणारा यशस्वी जयस्वालने ( Yashasvi Jaiswal ) पहिल्याचं सामन्यात सेंच्युरी झळकावत स्वतःचं नाण खणखणीत बजावलंय. दरम्यान फलंदाजी करताना या युवा खेळाडूचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये तो चांगलाच संतापलेला दिसतोय.
21 वर्षीय यशस्वी जयस्वालने ( Yashasvi Jaiswal ) वेस्ट इंडिजविरूद्धच्या सामन्यात टीम इंडियाकडून डेब्यू केलं. यावेळी त्याने पहिल्याच सामन्यात शानदार शतक केलं असून अजून तो नाबाद आहे. यशस्वी जयस्वाल 143 रन्सवर नाबाद खेळत असून त्याचा संतापलेला एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.
पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी ही घटना घडली. वेस्ट इंडिजचा गोलंदाज रोच गोलंदाजी करत होता. यावेळी यशस्वीने ( Yashasvi Jaiswal ) शॉट खेळून एक रन घेतला. यावेळी रन घेताना यशस्वी चांगलाच संतापलेला दिसला. इतकंच नव्हे तर त्याने वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना अपशब्द देखील वापरले.
झालं असं की, रन घेत असताना वेस्ट इंडिजचा एक खेळाडू त्याच्या समोर आला. हा गोलंदाज दुसरा तिसरा कोणीही नसून गोलंदाज रोचच होता. दरम्यान त्याच्या या कृत्यावर यशस्वी जयस्वाल ( Yashasvi Jaiswal ) चांगलाच संतापला. आणि त्याने रागाच्या भरात त्याला अपशब्द वापरले.
युवा खेळाडू यशस्वी जयस्वालचं ( Yashasvi Jaiswal ) हे आक्रमक रूप पाहून त्याच्यासोबत फलंदाजी करत असताना विराट कोहली ( Virat Kohli ) देखील आश्चर्यचकित झाला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत जयस्वालने 350 बॉल्समध्ये 143 रन्स केलेत. यामध्ये 14 फोर्सचा समावेश आहे.
यशस्वी जयस्वाल ( Yashasvi Jaiswal ) सोबत ओपनिंगला आलेल्या रोहित शर्माने देखील कॅप्टन इनिंग खेळली. रोहित शर्माने ( Rohit Sharma ) 221 बॉल्समध्ये 10 फोर आणि 2 सिक्सेसच्या मदतीने 103 रन्स केले. हे त्याच्या टेस्ट कारकिर्दीतील हे 10 वं शतकं होतं. पहिल्या टेस्ट सामन्यात शतक झळकावून रोहित शर्माने स्टीव्ह स्मिथच्या रेकॉर्डची बरोबरी केलीये.