IPL 2024 Auction Live Updates : मिचेल स्टार्क ठरला आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू, पाहा किती मिळाली किंमत?

IPL 2024 Auction Live Updates: पहिल्यांदाच भारताबाहेर आयपीएलसाठी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. या लिलावामध्ये 333 खेळाडूंचं रजिस्ट्रेशन झालं असलं तरी यातील 33 खेळाडूंना विकत घेतलं जाणार आहे. 

IPL 2024 Auction Live Updates : मिचेल स्टार्क ठरला आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू, पाहा किती मिळाली किंमत?

IPL 2024 Auction Live Updates: आयपीएल चाहत्यांसाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. सर्वांना उत्सुकता असलेल्या आयपीएलच्या 17 व्या हंगामासाठी मिनी लिलाव आज होणार आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताबाहेर हा लिलाव होणार आहे. दुबईमधील या मिनी-लिलावात एकूण 333 खेळाडू सहभागी होणार आहेत. 10 संघांना 333 पैकी 77 खेळांडूंना आपल्या संघात निवडता येणार आहे. त्यामुळे कुठल्या खेळाडूचं नशीब चमकणार तर कोणाला डच्चू मिळणार हे जाणून घ्यायची उत्सुकता आहे. 

 

19 Dec 2023, 14:08 वाजता

IPL 2024 Auction Live Updates : रवींद्रनंतर शार्दुल सीएसकेच्या संघात 

शार्दुल ठाकूरला चेन्नई सुपर किंग्जने 4 कोटींची बोली लावत आपल्या संघात शामिल करुन घेतलं.

19 Dec 2023, 14:02 वाजता

IPL 2024 Auction Live Updates : रवींद्र सीएसकेकडून दिसणार खेळताना

रचिन रवींद्रला चेन्नई सुपर किंग्सने 1.80 कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात सहभागी करुन घेतलं आहे. रवींद्रची मूळ किंमत 50 लाख रुपये होती. 

19 Dec 2023, 13:56 वाजता

IPL 2024 Auction Live Updates : हसरंगा सनरायझर्सचा ताफ्यात 

वानिंदू हसरंगा सनरायझर्स हैदराबादमधून खेळताना दिसणार आहे. त्याला मूळ किंमत दीड कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात घेतलंय. 

19 Dec 2023, 13:52 वाजता

IPL 2024 Auction Live Updates : मनीष पांडेही अनसोल्ड

स्टार फलंदाज मनीष पांडेही विकला गेला नाही. मनीष पांडेची मूळ किंमत 50 लाख रुपये होती.

19 Dec 2023, 13:48 वाजता

IPL 2024 Auction Live Updates : करुण नायर आणि स्मिथ अनसोल्ड

तर नायरपाठोपाठ ऑस्ट्रेलियन खेळाडू स्टीव्ह स्मिथलाही कोणी विकत घेतलं नाही. स्मिथची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती.

19 Dec 2023, 13:46 वाजता

IPL 2024 Auction Live Updates : करुण नायर आणि स्मिथ अनसोल्ड

कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा करुण नायर पहिल्या फेरीत कोणीही विकत घेतलं नाही. नायरची मूळ किंमत 50 लाख रुपये होती.

 

19 Dec 2023, 13:43 वाजता

IPL 2024 Auction Live Updates : ट्रॅव्हिस हेड 6.80 कोटींमध्ये सनरायझर्सच्या संघात

हॅरी ब्रूक आयपीएलच्या पुढील हंगामात सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना दिसणार आहे. ट्रॅव्हिस हेडला सनरायझर्सने 6.80 कोटी रुपयांना विकत घेतले. त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती.

19 Dec 2023, 13:41 वाजता

IPL 2024 Auction Live Updates : रोव्हमन पॉवेलला राजस्थान रॉयल्सने 7.40 कोटीला घेतलं संघात 

IPL 2024 Auction Live Updates : रोव्हमन पॉवेलला विकत घेण्यासाठी नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात चुरशीची लढत पाहिला मिळाली. राजस्थान रॉयल्सने पैज जिंकून पॉवेलला 7.40 कोटी रुपयांला आपल्या ताफ्यात शामिल करुन घेतलं. पॉवेल आता राजस्थानकडून खेळताना दिसणार आहे. 

19 Dec 2023, 13:29 वाजता

IPL 2024 Auction Live Updates : ऑक्शनला सुरुवात, कोणावर लागणार सर्वाधिक बोली?

#IPLAuction 2024 मध्ये दुसरा खेळाडू इंग्लंडचा हॅरी ब्रूक बोली लागली. त्याची मूळ किंमत INR 2 कोटी एवढी होती.  @DelhiCapitals आणि @rajasthanroyals त्याच्यासाठी रस्सीखेच केली. पण त्याला 4 कोटीला @DelhiCapitals आपल्या संघात घेतलं आहे. 

19 Dec 2023, 13:24 वाजता

IPL 2024 Auction Live Updates : ऑक्शनला सुरुवात, कोणावर लागणार सर्वाधिक बोली?

#IPLAuction 2024 मध्ये रिले रोसोला कोणीही विकत घेतलं नाही.  या खेळाडूची मूळ किंमत INR 1 कोटी एवढी होती.