IPL 2024 Auction Live Updates : मिचेल स्टार्क ठरला आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू, पाहा किती मिळाली किंमत?

IPL 2024 Auction Live Updates: पहिल्यांदाच भारताबाहेर आयपीएलसाठी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. या लिलावामध्ये 333 खेळाडूंचं रजिस्ट्रेशन झालं असलं तरी यातील 33 खेळाडूंना विकत घेतलं जाणार आहे. 

IPL 2024 Auction Live Updates : मिचेल स्टार्क ठरला आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू, पाहा किती मिळाली किंमत?

IPL 2024 Auction Live Updates: आयपीएल चाहत्यांसाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. सर्वांना उत्सुकता असलेल्या आयपीएलच्या 17 व्या हंगामासाठी मिनी लिलाव आज होणार आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताबाहेर हा लिलाव होणार आहे. दुबईमधील या मिनी-लिलावात एकूण 333 खेळाडू सहभागी होणार आहेत. 10 संघांना 333 पैकी 77 खेळांडूंना आपल्या संघात निवडता येणार आहे. त्यामुळे कुठल्या खेळाडूचं नशीब चमकणार तर कोणाला डच्चू मिळणार हे जाणून घ्यायची उत्सुकता आहे. 

 

19 Dec 2023, 15:23 वाजता

IPL 2024 Auction Live Updates: केकेआरमध्ये सकारिया 

2 कोटी रुपये इतकी बेस प्राईज असणाऱ्या लॉकी फर्ग्यूसनवरही कोणत्या संघानं बोली लावली नाही. तर, 50 लाखांच्या बेस प्राईजवर चेतन सकारियाला केकेआरनं संघात स्थान दिलं आहे. 

 

19 Dec 2023, 15:18 वाजता

IPL 2024 Auction Live Updates:Tristan Stubbs वर लाखोंची बोली 

दिल्ली कॅपिटल्सकडून Tristan Stubbs साठी तब्बल 50 लाख रुपये मोजण्यात आले. तर, केएस भारतवर 50 लाखांची बोली लावत केकेआरनं त्याला संघात कायम ठेवलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या Josh Inglis वर 2 कोटी इतक्या मूळ किमतीत बोली लावण्यात आली. पण, त्याला कोणत्याही संघानं पसंती दिली नाही. 

19 Dec 2023, 14:58 वाजता

IPL 2024 Auction Live Updates : 'हे' खेळाडू पहिल्या प्रयत्नात राहिले अनसोल्ड 

1 रिले रोसो - (दक्षिण आफ्रिका) – मूळ किंमत रु 2 कोटी
2 करुण नायर (भारत) – मूळ किंमत 50 लाख रुपये
3 स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया) – मूळ किंमत रु 2 कोटी
4 मनीष पांडे (भारत) – मूळ किंमत 50 लाख रुपये

 

19 Dec 2023, 14:54 वाजता

IPL 2024 Auction Live Updates : 'या' खेळाडूंवर पैशांची बरसात, विदेशी खेळांडूंचा बोलबाला

1 पॅट कमिन्स- 20 कोटी 50 लाख - सनरायझर्स हैदराबाद
2 डेरिल मिशेल - 14 कोटी - चेन्नई सुपर किंग्स
3 हर्षल पटेल -11.75 कोटी -पंजाब किंग्ज
4 रोव्हमन पॉवेल -7.40 कोटी - राजस्थान

 

19 Dec 2023, 14:46 वाजता

IPL 2024 Auction Live Updates : वोक्स पंजाब किंग्जमध्ये सहभागी 

वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सला पंजाब किंग्जने 4.20 कोटी रुपयांमध्ये आपल्या टीममध्ये सहभागी करुन घेतलं आहे. 

19 Dec 2023, 14:44 वाजता

IPL 2024 Auction Live Updates : मिचेल धोनीच्या संघासोबत

डेरिल मिशेलला चेन्नई सुपर किंग्सने 14 कोटींना विकत घेतलंयय. मिशेलने वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्ध दोन सेंच्युरी ठोकल्या होत्या.

19 Dec 2023, 14:29 वाजता

IPL 2024 Auction Live Updates : हर्षल पंजाबच्या संघातून खेळणार

हर्षल पटेलला पंजाब किंग्जने 11.75 कोटी रुपयांना बोली लावून आपल्या संघात सहभागी करुन घेतलं आहे. गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज हर्षलसाठी रस्सीखेच पाहिला मिळाली. 

19 Dec 2023, 14:25 वाजता

IPL 2024 Auction Live Updates : कोएत्झी मुंबईकडून खेळणार आहे.

जेराल्ड कोएत्झीला मुंबई इंडियन्सने 5 कोटींना विकत घेतलंय. कोएत्झीची मूळ किंमत 2 कोटी रुपये एवढी होती.

19 Dec 2023, 14:17 वाजता

IPL 2024 Auction Live Updates : पॅट कमिन्सने रचला इतिहास, 20.50 कोटींमध्ये 'या' संघात सहभागी

पॅट कमिन्स हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. 20.50 कोटींमध्ये त्याला हैदराबादने आपल्या संघात सहभागी केलं आहे. कमिन्सला विकत घेण्यासाठी आरसीबीनेही धडपड केली, पण सनरायझर्सने बाजी मारली.

19 Dec 2023, 14:09 वाजता

IPL 2024 Auction Live Updates : ओमरझाई गुजरात टायटन्समध्ये सामील

अजमतुल्ला उमरझाईला गुजरात टायटन्सने 50 लाखांच्या मूळ किमतीत खरेदी केलंय. अजमतुल्ला उमरझाई हा अफगाणिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसला आहे.