IPL 2024 Auction Live Updates : मिचेल स्टार्क ठरला आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू, पाहा किती मिळाली किंमत?

IPL 2024 Auction Live Updates: पहिल्यांदाच भारताबाहेर आयपीएलसाठी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. या लिलावामध्ये 333 खेळाडूंचं रजिस्ट्रेशन झालं असलं तरी यातील 33 खेळाडूंना विकत घेतलं जाणार आहे. 

IPL 2024 Auction Live Updates : मिचेल स्टार्क ठरला आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू, पाहा किती मिळाली किंमत?

IPL 2024 Auction Live Updates: आयपीएल चाहत्यांसाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. सर्वांना उत्सुकता असलेल्या आयपीएलच्या 17 व्या हंगामासाठी मिनी लिलाव आज होणार आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताबाहेर हा लिलाव होणार आहे. दुबईमधील या मिनी-लिलावात एकूण 333 खेळाडू सहभागी होणार आहेत. 10 संघांना 333 पैकी 77 खेळांडूंना आपल्या संघात निवडता येणार आहे. त्यामुळे कुठल्या खेळाडूचं नशीब चमकणार तर कोणाला डच्चू मिळणार हे जाणून घ्यायची उत्सुकता आहे. 

 

19 Dec 2023, 09:04 वाजता

IPL 2024 Auction Live Streaming :  कोणाकडे किती रक्कम बाकी? (Purse Left Per Team)

चेन्नई सुपर किंग्सकडे 31.4 रुपये उपलब्ध असून 6 खेळाडूंचा स्लॉट आहे. दिल्ली कॅपिटल्सकडे  28.95 कोटी रुपये शिल्लक असून 9 खेळाडू खरेदी करु शकतात. गुजरात टायटन्सकडे 38.15 कोटी रुपये असून त्यांना 8 खेळाडू खरेदी करण्याची मुभा असणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सकडे  32.7 कोटी रुपये शिल्लक असून त्यांना 12 खेळाडू निवडता येणार आहेत. मुंबई इंडियन्सकडे 17.75 कोटी रुपये बाकी असून त्यांना 8 खेळाडू खरेदी करता येणार आहेत.

19 Dec 2023, 09:00 वाजता

IPL 2024 Auction Live Streaming :  कोणाकडे किती रक्कम बाकी? (Purse Left Per Team)

CSK - 31.4 कोटी रुपये
DC - 28.95 कोटी रुपये
GT - 38.15 कोटी रुपये
KKR -  32.7 कोटी रुपये
LSG - 13.15 कोटी रुपये
MI -  17.75 कोटी रुपये
PJKS - 29.1 कोटी रुपये
RCB - 23.25 कोटी रुपये
RR - 14.5 कोटी रुपये
SRH -  34 कोटी रुपये

19 Dec 2023, 08:58 वाजता

IPL 2024 Auction Live Streaming :  कुठे पाहाल LIVE स्ट्रिमिंग? (IPL 2024 Auction Live Streaming)

स्टार स्पोर्ट्सकडे IPL 2024 लिलावाची अधिकृत प्रसारक मान्यता असल्याना स्टार स्पोर्ट्स 2, स्टार स्पोर्ट्स 2 एचडी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट 1, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी हिंदी, स्टार स्पोर्ट्स 3, स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 तमिळ, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी तमिळ, तुम्ही स्टार स्पोर्ट्स 1 तेलुगु, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी तेलुगु आणि स्टार स्पोर्ट्स 1 कन्नड यावर तुम्ही लिलाव पाहू शकणार आहात. त्याशिवाय ऑनलाईनसाठी तुम्ही जिओ सिनेमावर (JioCinema) लिलाव पाहू शकणार आहात. 

19 Dec 2023, 08:54 वाजता

IPL 2024 Auction Live Streaming : आयपीएलचा लिलाव हा दुबईच्या वेळेनुसार सकाळी 11.30 वाजता तर भारतीय वेळेनुसार हा लिलाव दुपारी 1 वाजता सुरू होणार आहे.