IND Vs AUS LIVE Updates: विजयाच्या उंभरठ्यावर नेऊन विराट कोहली बाद! 85 धावांची झुंजार खेळी

IND vs AUS, LIVE World Cup 2023 : आयसीसी पुरुष विश्वचषक 2023 मध्ये आज भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. हा सामना एमए चिदंबरमच्या मैदानावर म्हणजेच चेपॉक, चेन्नई येथे खेळवला जाणार आहे.

IND Vs AUS LIVE Updates: विजयाच्या उंभरठ्यावर नेऊन विराट कोहली बाद! 85 धावांची झुंजार खेळी

India vs Australia Live : भारतीय क्रिकेट संघ आज (8 ऑक्टोबर) विश्वचषक स्पर्धेत आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर पाचवेळा चॅम्पियन ठरलेल्या ऑस्ट्रेलियासोबत भारताचा सामना होईल. 13व्या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचाही हा पहिलाच सामना असणार आहे. रोहित शर्मा आणि पॅट कमिन्स वनडे क्रिकेटच्या सर्वात मोठ्या स्पर्धेत प्रथमच कर्णधारपद भूषवणार आहेत. विजयाने सुरुवात करण्याकडे दोन्ही संघांचे लक्ष असणार आहे.

8 Oct 2023, 21:35 वाजता

टीम इंडियाचा स्टार विराट कोहलीने पुन्हा एकदा आपलं कर्तृत्व सिद्ध केलंय. विराटने टीम इंडियाला पराभवाच्या तोंडातून बाहेर काढलं. विराटने 85 धावांची झुंजार खेळी केली.

8 Oct 2023, 20:36 वाजता

विराट कोहली पाठोपाठ केएल राहुल याने देखील अर्धशतक झळकावलं आहे. 71 बॉलमध्ये 50 धावा पूर्ण केल्या.

8 Oct 2023, 20:29 वाजता

टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध संयमी खेळी करत अर्धशतक झळकावलं आहे. विराट कोहलीने 77 बॉलमध्ये 50 धावा पूर्ण केल्या अन् टीम इंडियाला विजयाच्या वाटेवर पुन्हा आणून ठेवलंय.

8 Oct 2023, 18:41 वाजता

टीम इंडियाची सुरूवात अतिशय खराब झाली असून पहिले तीन फलंदाज शुन्यावर बाद झाले आहेत. रोहित अन् इशाननंतर आता श्रेयय अय्यर देखील शुन्यावर बाद झालाय.

8 Oct 2023, 18:38 वाजता

इशान किशन पाठोपाठ रोहित शर्मा देखील शुन्यावर बाद झालाय. त्यामुळे आता टीम इंडियाची परिस्थिती 2-2 अशी झालीयेय

8 Oct 2023, 18:33 वाजता

शुभमन गिलच्या जागी टीम इंडियामध्ये संधी मिळालेल्या इशान किशनला पहिल्या सामन्यात भोपळा देखील फोडता आला नाही. तो पहिल्याच बॉलचा सामना करताना बाद झाला.

8 Oct 2023, 18:03 वाजता

जडेजा भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज; बुमराह, यादवही चमकले

भारताकडून सर्वाधिक विकेट्स रविंद्र जडेजाने घेतल्या. 10 ओव्हरपैकी 2 ओव्हर निर्धाव टाकत 28 धावांच्या मोबदल्यात जडेजाने 3 गडी बाद केले. जसप्रीत बुमराहने आणि कुलदीप यादवने प्रत्येक 2 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्वीनने प्रत्येक एक विकेट घेतली.

8 Oct 2023, 18:02 वाजता

भारताला विजयासाठी हव्यात 200 धावा; ऑस्ट्रेलियन संघ All Out

मिचेल स्टार्क मोठा फटका मारण्याच्या नादात 50 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर झेलबाद झाला. मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर स्टार्क 35 चेंडूंमध्ये 28 धावा करुन श्रेयस अय्यरकरवी झेलबाद झाला. ऑस्ट्रेलियन संघ डावातील 3 चेंडू शिल्लक असतानाच 199 धावांवर तंबूत परतला. 

8 Oct 2023, 17:55 वाजता

ऑस्ट्रेलियाचा 9 वा गडी बाद! विराट कोहलीने पकडला झेल

ऑस्ट्रेलियन गोलंदाज अॅडम झाम्पा झेलबाद झाला आहे. संघाची धावसंख्या 189 वर असताना मोठा फटका मारण्याच्या नादात झाम्पा बाद झाला. हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर झाम्पा विराटकरवी झेलबाद झाला. झाम्पाने 20 चेंडूत 6 धावा केल्या.

8 Oct 2023, 17:27 वाजता

ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स झेलबाद! ऑस्ट्रेलियाचे 8 खेळाडू तंबूत

ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स मोठा फटका मारण्याच्या नादात जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर श्रेयस अय्यरकरवी झेलबाद झाला. संघाची धावसंख्या 165 इतकी असताना कमिन्सच्या रुपाने 8 गडी बाद झाला.