India vs Australia Live : भारतीय क्रिकेट संघ आज (8 ऑक्टोबर) विश्वचषक स्पर्धेत आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर पाचवेळा चॅम्पियन ठरलेल्या ऑस्ट्रेलियासोबत भारताचा सामना होईल. 13व्या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचाही हा पहिलाच सामना असणार आहे. रोहित शर्मा आणि पॅट कमिन्स वनडे क्रिकेटच्या सर्वात मोठ्या स्पर्धेत प्रथमच कर्णधारपद भूषवणार आहेत. विजयाने सुरुवात करण्याकडे दोन्ही संघांचे लक्ष असणार आहे.
8 Oct 2023, 08:08 वाजता
IND Vs AUS World Cup 2023 LIVE Updates : विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघामधील 13 वा सामना
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विश्वचषकात भारताने आतापर्यंत केवळ चार सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर आठ वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. चार विजयांबद्दल बोलायचे झाल्यास, भारताने 1983, 1987, 2011 आणि 2019 मध्ये पाच वेळा चॅम्पियन संघाचा पराभव केला आहे. 2003 च्या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना आणि 2015 च्या विश्वचषकाचा उपांत्य सामना देखील या दोघांमध्ये खेळला गेला होता. या दोन्ही सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला.
8 Oct 2023, 08:05 वाजता
IND Vs AUS World Cup 2023 LIVE Updates : इतिहास काय सांगतो?
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत, ऑस्ट्रेलियाने 12 पैकी 8 वेळा भारताचा पराभव केला आहे. तर भारताने केवळ चार वेळा विजय मिळवला आहे. त्यामुळे भारताच्या नजराही आज हा विक्रम सुधारण्यावर असतील. दुसरीकडे भारताने नुकतीच ऑस्ट्रेलियाविरुद्धची तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली. रविवारी चेन्नई येथे होणाऱ्या आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक 2023 सामन्यात भारत ऑस्ट्रेलियावर विजय मिळवून ही लढत आणखी रंगतदार करण्याची शक्यता आहे.
- ‹ previous
- 1
- 2
- 3
- 4