IND vs PAK LIVE: भारत पाकिस्तान उर्वरित सामना 'रिझर्व्ह दिवशी'; आजचा दिवस पावसामुळे पाण्यात..

Asia Cup, India vs Pakistan : पहिला सामना पावसाने धुवून निघाल्यानंतर आता रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला खेळवला जाणार जातोय.

IND vs PAK LIVE: भारत पाकिस्तान उर्वरित सामना 'रिझर्व्ह दिवशी'; आजचा दिवस पावसामुळे पाण्यात..

India vs Pakistan Asia Cup Live Score​ : सध्या श्रीलंकेत सुरू असलेल्या आशिया कपमध्ये (Asia Cup) दुसऱ्यांदा भारत आणि पाकिस्तान (IND VS PAK) यांच्या सामना खेळवला जाणार आहे. पहिला सामना पावसाला वाहिल्यानंतर आता दोन्ही संघ जिंकण्याच्या दृष्टीकोनातून मैदानात उतरतील. मात्र, रविवारीही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आता क्रिडाप्रेमींची चिंता वाढलीये. मात्र, सामना झाला तर कोण बाजी मारणार? भारत की पाकिस्तान?  याकडे सर्वांचं लक्ष लागंलय.

10 Sep 2023, 15:38 वाजता

कॅप्टन रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी दमदार सुरूवात केली आहे. शुभमन गिलने पहिल्या पाच ओव्हरमध्ये तीन फोर खेचत पाकिस्तानच्या बॉलिंग लाईनअपला तगडं उत्तर दिलंय.

10 Sep 2023, 14:37 वाजता

पाकिस्तानविरूद्ध टीम इंडियाची प्लेईंग 11

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन, केएल राहुल, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव.

 

10 Sep 2023, 14:33 वाजता

रोहित शर्माने टीममध्ये केले 2 मोठे बदल

के.एल राहुल आणि जसप्रीत बुमराहचं झालं कमबॅक, तर श्रेयस अय्यरला बाहेरचा रस्ता

 

 

10 Sep 2023, 14:32 वाजता

पाकिस्तान टीमचा कर्णधार बाबर आझमने जिंकला टॉस, टीम इंडियाला दिलं प्रथम फलंदाजीचं निमंत्रण

10 Sep 2023, 14:29 वाजता

भारत-पाकिस्तान सामन्यांची आकडेवारी

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 133 वनडे सामने खेळले गेले आहेत. यात पाकिस्तानने 73 सामने जिंकले आहेत, तर भारतीय संघाने 55 सामने जिंकले आहेत. पाच सामने अनिर्णित राहिले. कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये दोन सामने झाले. 

10 Sep 2023, 14:21 वाजता

कोलंबोमध्ये दोन्ही टीमचा रेकॉर्ड

कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर भारताने 46 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये टीम इंडियाने 23 सामने जिंकले आणि 19 सामने गमावले. चार सामने अनिर्णित राहिले. त्याचबरोबर या मैदानावर पाकिस्तानने 24 वनडे सामने खेळले आहेत. त्यांनी 14 सामने जिंकले आणि आठ गमावले. दोन सामने अनिर्णित राहिले.

10 Sep 2023, 14:19 वाजता

कोलंबोमध्ये सध्या ऊन पडलंय आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावाही केला जातोय की, संध्याकाळी 7 वाजण्यापूर्वी पाऊस पडण्याची शक्यता नाही.

10 Sep 2023, 14:16 वाजता

10 Sep 2023, 10:35 वाजता

10 तारखेला होणाऱ्या सामन्यावर पावसाचं सावट पाहता आशियाई क्रिकेट काऊंसिलने ( Asian Cricket Cousil ) मोठा निर्णय घेत भारत - पाकिस्तान सामन्यासाठी रिझर्व्ह डे ठेवला आहे. त्यानुसार 11 सप्टेंबर रोजी हा सामना खेळवण्यात येईल. मात्र जर 11 तारखेला देखील हा सामना पूर्ण होऊ शकला नाही तर कोणती टीम पुढे जाणार? पाहा-

Asia Cup 2023: 'रिझर्व्ह डे'ला IND-PAK सामना पावसाने रद्द झाला तर कोणाला मिळणार फायनलचं तिकीट? पाहा कसं आहे समीकरण

 

10 Sep 2023, 08:38 वाजता

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना कुठे पाहता येईल?

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्याचे स्टार स्पोर्ट्स चॅनलवर थेट प्रक्षेपण होणार आहे. हा सामना तुम्ही वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळ्या चॅनेलवर पाहू शकता. त्याच वेळी डीडी स्पोर्ट्सवर देखील सामना फ्री दिसणार आहे