IND vs PAK LIVE: भारत पाकिस्तान उर्वरित सामना 'रिझर्व्ह दिवशी'; आजचा दिवस पावसामुळे पाण्यात..

Asia Cup, India vs Pakistan : पहिला सामना पावसाने धुवून निघाल्यानंतर आता रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला खेळवला जाणार जातोय.

IND vs PAK LIVE: भारत पाकिस्तान उर्वरित सामना 'रिझर्व्ह दिवशी'; आजचा दिवस पावसामुळे पाण्यात..

India vs Pakistan Asia Cup Live Score​ : सध्या श्रीलंकेत सुरू असलेल्या आशिया कपमध्ये (Asia Cup) दुसऱ्यांदा भारत आणि पाकिस्तान (IND VS PAK) यांच्या सामना खेळवला जाणार आहे. पहिला सामना पावसाला वाहिल्यानंतर आता दोन्ही संघ जिंकण्याच्या दृष्टीकोनातून मैदानात उतरतील. मात्र, रविवारीही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आता क्रिडाप्रेमींची चिंता वाढलीये. मात्र, सामना झाला तर कोण बाजी मारणार? भारत की पाकिस्तान?  याकडे सर्वांचं लक्ष लागंलय.

10 Sep 2023, 20:54 वाजता

IND vs PAK  Match On Reserve Day : भारत पाकिस्तान सामन्यात रिझर्व्ह डे ठेवला गेल्याने आता सामना उद्या खेळवला जाणार आहे. सामना पहिल्यापासून सुरू होणार नसून उद्या आजच्या चालू परिस्थितीत सामना खेळवला जाईल. म्हणजेच उद्या भारताची फलंदाजी 25 व्या ओव्हरपासून सुरू होईल.

10 Sep 2023, 20:02 वाजता

भारत पाकिस्तान सामन्याची संभाव्य परिस्थिती -

1. आज पूर्ण करण्यास प्राधान्य असणार आहे. 
2.आजचा सामना पूर्ण करण्यासाठी पाकिस्तानच्या फलंदाजीसाठी किमान 20 षटकांची गरज...
3. 20 षटकांचा खेळ झाल्यास पाकिस्तान 181 धावांचे आव्हान देण्यात येईल.
4. 20 षटके शक्य नसल्यास राखीव दिवसात म्हणजे उद्या सामना होणार आहे.
5. आज सामना झाला नाही तर उद्या भारत आज थांबला तिथून सुरू करेल.

10 Sep 2023, 19:31 वाजता

डकवर्थ लुईस नियमानुसार, उशिरा पाऊस थांबला तर... पाकिस्तानला 20 षटकांत 181 धावा, 21 षटकांत 187 धावा, 22 षटकांत 194 धावा, 23 षटकांत 200 धावा आणि 24 षटकांत 206 धावा आव्हान मिळू शकतं.

10 Sep 2023, 18:14 वाजता

भारत-पाकिस्तानच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आलीये... कोलंबोमध्ये पाऊस थांबला असून कव्हर काढले आहेत.

10 Sep 2023, 17:07 वाजता

10 Sep 2023, 16:55 वाजता

भारत पाकिस्तान सामन्यात पावसाची एन्ट्री झालीये. टीम इंडियाने 24 ओव्हरमध्ये 147 धावा मैदानात केल्या आहेत. केएल राहुल 17 धावा अन् विराट कोहली 8 धावांवर खेळतोय.

IND 147/2 (24.1)

10 Sep 2023, 16:22 वाजता

शाहीन अन् हॅरिसला जमलं नाही ते शाबादने करून दाखवलं. टीम इंडियाला पहिला धक्का बसला आहे. रोहित शर्मा 56 धावा करून बाद झाला. त्यानंतर आता विराट कोहली मैदानात आलाय.

10 Sep 2023, 16:03 वाजता

शुभमन गिलने धमाकेदार सुरूवात करत टीम इंडियाला सुरूवात करून दिली. तर त्यानंतर रोहितने दम दाखवला. शाबाद खानला चार चांद दाखवत रोहितने पूर्ण कसर भरून काढली. त्याचबरोबर आता टीम इंडियाच्या 100 धावा पूर्ण झाल्या आहेत.

10 Sep 2023, 15:59 वाजता

टीम इंडियाचा स्टार सलामीवीर शुभमन गिलने धमाकेदार अर्धशतक पूर्ण केलंय. 37 बॉलमध्ये त्याने धुंवाधार फलंदाजी करत 50 धावा पूर्ण केल्या.

10 Sep 2023, 15:56 वाजता