IPL 2023 RCB vs GT: शुभमन गिलने केली 'मुंबई इंडियन्स'ची चांदी; MI प्लेऑफमध्ये... किंग कोहलीचं शतक व्यर्थ!

IPL 2023 RCB vs GT LIVE: आजचा सामना बंगळुरूच्या चेन्नास्वामी स्टेडियमवर, रॉयल चॅलेजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स (Royal Challengers Bangalore vs Gujarat Titans) यांच्यात खेळला गेला.

IPL 2023 RCB vs GT: शुभमन गिलने केली 'मुंबई इंडियन्स'ची चांदी; MI प्लेऑफमध्ये... किंग कोहलीचं शतक व्यर्थ!

IPL 2023 RCB vs GT LIVE: आयपीएल 2023 मधील प्लेऑफसाठी अखेर मुंबई इंडियन्सने क्वालिफाय केलं आहे. आज खेळल्या गेलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स (Royal Challengers Bangalore vs Gujarat Titans) यांच्यातील सामन्यात प्लेऑफ (IPL 2023 Playoffs) गाठणारा चौथा संघ कोणता? यावर शिक्कामोर्तब होणार झालं.

22 May 2023, 00:20 वाजता

मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये...

शुभमन गिल अखेरच्या बॉलवर सिक्स खेचत गुजरात टायटन्सला विजय मिळला आहे. या सामन्यातील विजयासह मुंबईने प्लेऑफमध्ये क्वालिफाय केलं आहे. आजच्या सामन्यात विराट कोहलीने देखील शतक खेचलं. मात्र, शुभमनचं शतक भारी ठरल्याचं दिसून आलं आहे.

22 May 2023, 00:04 वाजता

सामना रोमांचक स्थितीत... अखेरच्या ओव्हरमध्ये गुजरातला 8 धावांची गरज

22 May 2023, 00:00 वाजता

गुजरात टायटन्सला 12 चेंडूत 19 धावा हव्या आहेत.

GT 180/4 (18.1)

21 May 2023, 23:42 वाजता

गुजरात टायटन्सला विजयासाठी 27 चेंडूत 48 धावा हव्या आहेत.

GT 150/3 (15.3)  CRR: 9.68  REQ: 10.67

21 May 2023, 23:18 वाजता

गुजरात टायटन्सला विजयासाठी 55 चेंडूत 97 धावा हव्या आहेत. 

GT 102/1 (11) 

CRR: 9.27  REQ: 10.67

21 May 2023, 22:44 वाजता

गुजरातला पहिला धक्का बसला आहे. मोहम्मद सिराजने काढली वृद्धीमान साहाची विकेट काढत पहिला धक्का दिलाय.

21 May 2023, 22:14 वाजता

आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 197 धावा केल्या आहेत. तर आता गुजरातसमोर 198 धावांचं टार्गेट असणार आहे. विराट कोहलीने या सामन्यात झुंजार खेळी करत शतक झळकावलं. 

RCB 197/5 (20)

21 May 2023, 22:05 वाजता

Virat kohli Century: विराट कोहलीने झुंजावती शतक ठोकलं आहे. एकीकडे विकेट्स पडत असताना आरसीबीसाठी तो एकटा नडताना दिसतोय. फक्त 60 बॉलमध्ये विराट कोहलीने शतक साजरं केलंय.

21 May 2023, 21:55 वाजता

शेवटच्या तीन ओव्हर बाकी असून किंग कोहली अजूनही 77 धावा करत क्रिझवर आहे.

RCB 155/5 (17)

21 May 2023, 21:43 वाजता

महत्त्वाच्या सामन्यात दिनेश कार्तिक पुन्हा फेल झालाय. विराट एकाकी झुंज देत असताना डीके गोल्डन डकवर बाद झाला.