World Cup IND vs NZ Live Score: वर्ल्ड कप 2023 स्पर्धेतील 21 वा सामना आज भारत आणि न्यूझीलंडदरम्यान खेळवला जात आहे. पॉइण्ट्स टेबलमधील अव्वल 2 संघांचा हा सामना हिमाचलमधील धर्मशालाच्या मैदानात खेळवला जात असून दोन्ही संघांनी स्पर्धेतील आतापर्यंतचे आपआपले 4 ही सामने जिंकलेले आहेत. त्यामुळे या सामन्यामध्ये बाजी मारुन कोण अव्वल स्थानी कायम राहणार हे आज निश्चित होणार आहे. याच सामन्यासंदर्भातील लाइव्ह अपडेट्स आपण या ठिकाणी पाहू शकता...
22 Oct 2023, 17:34 वाजता
न्यूझीलंडला पाचवा धक्का!!
न्यूझीलंडच्या डावाचा पाचवा विकेट गेलाय. ग्लेन फिलिप्स 26 बॉलमध्ये 23 धावा करत बाद झाला. कुलदीपच्या बॉलवर रोहित शर्माने कॅच घेतला.
22 Oct 2023, 17:14 वाजता
स्टार फलंदाज डॅरिल मिशेलचं शतक पूर्ण झालं असून आता न्यूझीलंडची 300 च्या दिशेने वाटचाल सुरू झालीये. डॅरिल मिशेलने 100 बॉलमध्ये आपलं शतक पूर्ण केलं.
22 Oct 2023, 16:56 वाजता
कुपदीप यादवने न्यूझीलंडला चौथा धक्का दिला आहे. टॉम लेथम 5 धावा करून बाद झाला.
NZ 206/4 (37.2)
22 Oct 2023, 16:23 वाजता
रचिन रविंद्र आणि डॅरेल मिचेलची न्यूझीलंडसाठी टिचून फलंदाजी; दोघांनीही झळकावली अर्धशतकं
न्यूझीलंडचे मधल्या फळीतील रचिन रविंद्र आणि डॅरेल मिचेल या दोघांनीही अर्धशतकं झळकावली असून संघाचं स्कोअरकार्ड 30 ओव्हरमध्ये 150 हून अधिकपर्यंत नेलं आहे. भारतीय गोलंदाजांना ही पार्टनरशीप तोडण्यात यश आलेलं नाही.
22 Oct 2023, 15:28 वाजता
2 विकेट्स गेल्यानंतर न्यूझीलंडचा डाव स्थिरावला! रचिन आणि डॅरेल मिचेलची जोडी जमली
विल याँग आणि डेव्हॉन कॉनव्हे हे सलामीवर स्वस्तात तंबूत परतल्यानंतर रचिन रविंद्र आणि डॅरेल मिचेल यांनी न्यूझीलंडचा डाव सावरला आहे. 19 ओव्हरमध्ये न्यूझीलंडची धावसंख्या 90 वर पोहचली आहे.
22 Oct 2023, 14:43 वाजता
मोहम्मद शामीने वर्ल्ड कपमधील पहिल्याच बॉलवर घेतली विकेट
शार्दूल ठाकुरच्या जागी भारतीय संघात संधी मिळालेल्या मोहम्मद शामीने संधीचं सोनं केलं आहे. शामीने वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच गोलंदाजी करताना पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली आहे. शामीने न्यूझीलंडचा सलामीवर विल याँगला बोल्ड केलं. सामन्यातील 9 व्या ओव्हरला न्यूझीलंडची धावसंख्या 19 वर असताना भारताला दुसरं यश मिळालं.
22 Oct 2023, 14:24 वाजता
भारताला पहिलं यश! मोहम्मद सिराजने डेव्हॉन कॉनव्हेला केलं बाद
सामन्यातील चौथ्याच ओव्हरमध्ये भारताला पहिली विकेट मिळाली आहे. मोहम्मद सिराजने टाकलेल्या चेंडूवर डेव्हॉन कॉनव्हेने चौकार माराण्याचा प्रयत्न केला. मात्र श्रेयस अय्यरने अप्रतिम झेल घेत कॉनव्हेला तंबूत पाठवलं. संघाची धावसंख्या 9 वर असताना 9 चेंडू खेळून भोपळाही न फोडता डेव्हॉन कॉनव्हे बाद झाला.
22 Oct 2023, 13:57 वाजता
न्यूझीलंडविरुद्ध अशी आहे भारताची Playing XI! सूर्याची संघात एन्ट्री तर शार्दुलच्या जागी...
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यामध्ये नाणेफेक जिंकल्यानंतर रोहित शर्माने संघामध्ये 2 प्रमुख बदल करण्यात आल्याचं सांगितलं आहे. भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात पहिल्यांदाच 2 नव्या खेळाडूंचा या स्पर्धेतील प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला आहे. सूर्यकुमार यादवला संघात स्थान देण्यात आलं आहे. तर शार्दुल ठाकूरला संघातून डच्चू देण्यात आला आहे. शार्दुलच्या जागी कोणाला संघात स्थान मिळालं आहे पाहा येथे क्लिक करुन...
22 Oct 2023, 13:34 वाजता
भारताने टॉस जिंकला! प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय
भारतीय कर्णधार रोहित शर्माने धरमशाला येथे खेळवल्या जात असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातील टॉस जिंकला आहे. भारताने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
22 Oct 2023, 13:15 वाजता
आमने-सामने रेकॉर्ड काय सांगतो?
भारत आणि न्यूझीलंडने एकमेकांविरोधात एकूण 116 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यापैकी भारताने 58 सामने जिंकले असून 50 सामने न्यूझीलंडने जिंकले आहेत. यापैकी 7 सामन्यांचा कोणताही निकाल लागला नाही तर 1 सामना अनिर्णित राहिला.