महाराष्ट्र केसरी: अभिजित कटके विरुद्ध किरण भगत यांच्यात रंगणार अंतिम सामना

पुण्याचा मल्ल आणि गेल्या वर्षीचा उपविजेता अभिजित कटकेनं महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

Updated: Dec 23, 2017, 09:27 PM IST
महाराष्ट्र केसरी: अभिजित कटके विरुद्ध किरण भगत यांच्यात रंगणार अंतिम सामना title=

पुणे : पुण्याचा मल्ल आणि गेल्या वर्षीचा उपविजेता अभिजित कटकेनं महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

उपांत्य फेरीत अभिजितनं बीडच्या अक्षय शिंदेवर 10-0 असा एकतर्फी विजय मिळवला.

महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत अभिजित कटकेची लढत होणार आहे ती साता-याच्या किरण भगतशी.

दुसऱ्या उपांत्य फेरीत किरण भगतनं बुलढाण्याच्या बाळा रफीक शेखला एकेरी पट काढून चितपट करत अंतिम फेरी गाठली.

उपांत्य फेरीत विजय पटकवल्यानंतर अभिजित कटके आणि किरण भगतशी बातची केलीय आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांनी...

महाराष्ट्र केसरी: अभिजित कटके विरुद्ध किरण भगत यांच्यात रंगणार अंतिम सामना