केवळ या गोष्टीच्या आधारे करतो दमदार फटकेबाजी - रोहित शर्मा

टी-२० सीरिज आधीच खिशात घातलेला कर्णधार रोहित शर्मा आता तिस-या आणि शेवटच्या टी-२० सामन्यात विजयाचे दृष्टीनेच मैदानात उतरेल. 

Updated: Dec 23, 2017, 09:08 PM IST
केवळ या गोष्टीच्या आधारे करतो दमदार फटकेबाजी - रोहित शर्मा title=

नवी दिल्ली : टी-२० सीरिज आधीच खिशात घातलेला कर्णधार रोहित शर्मा आता तिस-या आणि शेवटच्या टी-२० सामन्यात विजयाचे दृष्टीनेच मैदानात उतरेल. दुस-या टी-२० सामन्यात रोहितने शानदार प्रदर्शन करत ४३ बॉल्समध्ये १२ फोर आणि दहा सिक्सर लगावत ११८ रन्स केले. केवळ ३५ बॉल्समध्ये शतक लगावत त्याने दक्षिण आफ्रिकेच्या डेविड मिलरच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे.  

‘माझा यावर विश्वास’

रोहितने दमदार खेळी करण्याचं गुपित त्याने उघड केलंय. तो म्हणाला की, ‘खरं सांगायचं तर माझ्याकडे इतकी ताकद नाहीये मी मोठे शॉट्स खेळावे. मी बॉलच्या टायमिंगवर खूप जास्त विश्वास ठेवतो. मला असं वाटतं की, ही माझी ताकदही आहे आणि माझी कमकोरीही आहे. मी मैदान बघून त्यानुसार अधिकाधीक खेळण्याचा प्रयत्न करतो’.

रोहितच्या बोलण्यात तथ्य

रोहितच्या या बोलण्यात ब-याचअंशी तथ्य आहे. तो फारच सहज बॉल बाऊंड्रीच्या बाहेर करतो. तो क्रिस गेलसारखा आक्रामक फलंदाज नाहीये, जो पॉवर हिटींगवर विश्वास करतो. रोहित वनडे क्रिकेटमध्ये तीन दुहेरी शतकं आणि टी-२० मध्ये दोन शतकं करणारा एकुलता एक खेळाडू आहे. 

लांब शॉटचं टेक्निक

लांब शॉट लगावण्यासाठी टेक्निकमध्ये तो काही बदल करतो का? या प्रश्नावर तो म्हणाला की, ‘सहा ओव्हरनंतर फिल्ड पसरून जाते. मी बघतओ कुठे फोर लगावले जाऊ शकतात. हे आवश्यक आहे की, फिल्डच्या अनुरूप खेळलं जावं’. तो म्हणाला की, ‘मला मैदानाच्या सगळ्याच भागातून रन्स काढायचे असतात’.

तेव्हा माझ्यावर खूप दबाव

टी-२० क्रिकेटमध्ये दुहेरी शतक लगावण्याच्या प्रश्नावर तो म्हणाला की, ‘मी असा काही विचार करत नाहीये. मी केवळ रन्स करण्याच्या विचार करतो. कोणतंही लक्ष्य घेऊन खेळत नाही. कोणत्याही रेकॉर्डसाठी मी रन करत नाही. माझं लक्ष्य मैदानात जाऊन जास्तीत जास्त रन्स करणं असतं’. धर्मशाला वनडे सामना गमावल्यावर त्याने सांगितले की, त्याच्यावर खूप दबाव होता. तो म्हणाला की, ‘मी माझ्या नेतृत्वाबद्दल आणि टीमबद्दल बराच विचार केला. आम्ही देशातील १४० कोटी जनतेचं प्रतिनिधीत्व करत असतो आणि आमच्यावर खूप दबाव असतो’.