सचिन तेंडुलकरने असं का केलं? जयवर्धनेला खेचत मैदानाबाहेर काढण्याचा VIDEO व्हायरल

सचिन तेंडुलकरने चक्क खेचत महेला जयवर्धनेला मैदानाबाहेर काढलं.

Updated: Apr 16, 2022, 11:50 AM IST
सचिन तेंडुलकरने असं का केलं? जयवर्धनेला खेचत मैदानाबाहेर काढण्याचा VIDEO व्हायरल title=

मुंबई : आयपीएलचा 15 वा सिझन मुंबई इंडियन्ससाठी चांगला राहिलेला नाही. या सिझनमध्ये मुंबईला अजून एकाही विजयाची नोंद करता आली नाही.  मुंबईने आतापर्यंत 5 सामने खेळले असून एकाही सामन्यात त्यांना विजय नोंदवता आला नाही. पंजाबविरूद्धचा हातातोंडाशी आलेला सामनाही मुंबईने गमावला. मात्र या सामन्यातील एका घटनेचा व्हिडीयो आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पंजाबविरूद्धच्या सामन्यात बेबी एबी या नावाने प्रसिद्ध असलेला डेवाल्ड ब्रेविस क्रिझहोता. फलंदाजी करताना डेवाल्ड नर्वस दिसून आला. यावेळी टाइम आऊट दरम्यान काहीतरी घडलं ज्याचा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीयोमध्ये सचिन तेंडुलकरने चक्क खेचत महेला जयवर्धनेला मैदानाबाहेर काढलं.

मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने ब्रेविससोबत बोलत होते. टाइमआऊट दरम्यान, महेला जयवर्धने अतिशय गंभीर अवस्थेत दिसले. यावेळी डेवाल्ड ब्रेविस शांतपणे जयवर्धनेचं बोलणं ऐकत होता.

महेला जयवर्धनेचं म्हणणे ऐकून डेवाल्ड ब्रेविस थोडा नर्वस दिसत होता. महेला जयवर्धनेच्या बोलण्याने डेवाल्ड ब्रेविसवर दबाव येईल म्हणून सचिन तेंडुलकरने गंमतीने त्याला मैदानाबाहेर खेचण्याचा निर्णय घेतला. सामना सुरू झाला आणि टीव्हीवर व्हिडिओ दाखवला गेला, त्यानंतर मुंबईच्या सपोर्ट स्टाफला हसू आवरता आलं नाही.

IPL 2022 मधील मुंबई इंडियन्स ही एकमेव टीम आहे जिने आतापर्यंत एकंही सामना जिंकलेला नाही. अशा परिस्थितीत मुंबईची टीम विजयी मार्गावर परतली नाही तर त्यांचा प्लेऑफचा मार्गही खडतर होणार आहे.