नवी दिल्ली : आयपीएल सामन्यात चेन्नईच्या टीमने महेंद्रसिंगच्या नेतृत्वाखाली कोहलीच्या बंगळूरच्या टीमला धूळ चारली. यानंतर लगेचच तो ड्युटीवर रुजू झाला. माहीची दुसरी कोणती ड्युटी ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर माही हा दुसऱ्या तिसऱ्या कोणत्या नाही तर 'डॅडी ड्युटी' वर गेला. सोशल मीडियावर त्याचा आणि मुलगी जीवाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये तो जीवाचे केस विंचरताना दिसतोय. या व्हिडिओला काही सेकंदात लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. मॅच संपली.शानदार विजयानंतर 'डॅडी ड्युटी' वर रुजू. धोनीने विराटच्या टीमला ५ विकेटने हरविले. बंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर सात वर्षांपूर्वी एप्रिलमध्ये झालेल्या वर्ल्डकप फायनलच्या आठवणी ताज्या करतानाम महेंद्रसिंग धोनीने बंगळूरुविरुद्धच्या सामन्यात शेवटचा षटकार ठोकत विजय मिळवून दिला. फरक एवढाच होता की त्यावेळी धोनी वर्ल्डकपमध्ये खेळत होता आणि आता आयपीएलमध्ये.
धोनीने बुधवारी चेन्नई संघाला बंगळूरुविरुद्ध पाच विकेटनी हरवले. बंगळूरुने चिन्नास्वामी स्टेडियममध्ये एबी डेविलियर्स आणि क्विंटन डिकॉकच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर ८ बाद २०५ धावा केल्या.प्रत्युत्तरादाखल धोनीच्या नाबाद ७० आणि अंबाती रायडूच्या ८२ धावांच्या जोरावर चेन्नईला बंगळूरुविरुद्ध विजय मिळवला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी १०१ धावांची भागीदारी केली. रायडूने ५३ चेंडूत तीन चौकार आणि आठ षटकारांच्या सहाय्याने ८२ धावा केल्या. मात्र रायडू १८व्या ओव्हरमध्ये बाद झाला. त्यावेळी चेन्नईला अखेरच्या दोन षटकांत जिंकण्यासाठी ३० धावा हव्या होत्या.