WTC Points Table : नुकतंच अॅशेज सिरीजची ( Ashes Series 2023 ) समाप्ती झाली असून ही सिरीज ड्रॉ झाली आहे. इंग्लंड विरूद्ध ऑस्ट्रेलिया ( England vs Australia ) या दोघांनीही 2-2 सामने जिंकले असल्याने ही अॅशेज सिरीज ( Ashes Series 2023 ) बरोबरीमध्ये सुटली. दरम्यान या सिरीजनंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ( ICC World Test Championship ) पॉईंट्स टेबलमध्ये मोठा फेरबदल झाल्याचं दिसून येतंय. दरम्यान याचा फरक टीम इंडियावर ( Team India ) कसा पडला, हे पाहुयात.
अॅशेज सिरीजपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ( ICC World Test Championship ) नव्या सायकलची सुरुवात झाली आहे. ही नवी सायकल पाकिस्तानच्या टीमसाठी यशस्वी ठरताना दिसतेय. यावेळी पाकिस्तानच्या टीमने श्रीलंकेला 2-0 ने पराभूत करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये ( WTC Points Table ) अव्वल स्थान गाठलं आहे. 2 सामने जिंकण्याच्या बळावर पाकिस्तानच्या खात्यात 24 पॉईंट्स आहेत.
पाकिस्तान पहिल्या क्रमांकावर असून टीम इंडिया या पॉईंट्स ( WTC Points Table ) टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. मुख्य म्हणजे टेस्ट सामन्यांमध्ये टीम इंडियाची वेस्ट इंडिजविरूद्ध एकच सिरीज खेळून पूर्ण झाली आहे. या सिरीजमध्ये टीम इंडियाने ( Team India ) 1-0 असा वेस्ट इंडिजचा पराभव केलाय. तर दुसरा सामना ड्रॉ झाल्याने टीम इंडियाच्या खात्यात आतापर्यंत केवळ 16 पॉईंट्स झाले असून 66.67 टक्क्यांनी दुसऱ्या स्थानावर आहे.
How the #WTC25 standings look after the Ashes sanctions
: https://t.co/VGHNWYeMuh pic.twitter.com/rw4FvD7hh9
— ICC (@ICC) August 2, 2023
अॅशेज सिरीजमध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया ( England vs Australia ) या दोन्ही टीम्सना स्लो ओव्हर रेटचा फटका बसला होता. यावेळी स्लो ओव्हर रेटमुळे आयसीसीकडून ( ICC ) इंग्लंडच्या टीमने तब्बल 19 पॉईंट्स कापण्यात आले. त्यामुळे याचा मोठा फटका इंग्लंडच्या टीमला बसला आहे. यावेळी पॉईंट्स ( WTC Points Table ) टेबलमध्ये इंग्लंडची टीम वेस्ट इंडीजच्याही खाली आहे.
दरम्यान यावेळी ऑस्ट्रेलिया टीमचेही 10 पॉईंट्स कापण्यात आले. यामुळे ऑस्ट्रेलियाची टीम 30 टक्क्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.